
फोटो सौजन्य - Instagram
पोस्टरने घातला धुमाकूळ
‘निशांची’ या आगामी क्राईम-ड्रामा चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज गुरुवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता असे म्हणता येईल की यात गुन्हेगारी आणि नाट्याची देसी शैली असेल, जी प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन देऊ शकते. पोस्टरमध्ये प्रेम, सूड, संघर्ष, पश्चात्ताप, सर्वकाही एकत्र दिसत आहे आणि रिलीज झालेल्या पोस्टरवर लिहिले आहे की ‘दिल थामिए और जान बचाइए’ असे या पोस्टरवर लिहिलेले दिसत असून, या पोस्टरने लक्ष वेधले आहे. म्हणजेच अनुराग कश्यपचा हा चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपूर’ची झलक दाखवत असल्याचे दिसते आहे.
‘Saiyaara’ च्या यशाबद्दल दिग्दर्शक मोहित सुरीने व्यक्त केले मत; म्हणाले ‘मी कधीच विचार केला नव्हता…’
पोस्टर प्रदर्शित होताच कमेंट्सचा वर्षांव
‘निशांची’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित होताच कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. प्रसिद्ध अभिनेता विनीत कुमार सिंग यांनी लिहिले की, ‘हा एक धमाका आहे.’ त्याच वेळी, लेखक-निर्माता आदित्य कृपलानी म्हणाले की, ‘अखेर पोस्टर रिलीज झाले.’ याशिवाय, इतर वापरकर्त्यांनी लिहिले की, ‘अनुराग कश्यप एक धमाकेदार, उत्तम पोस्टरसह घेऊन येत आहे.’ असे लिहून चाहत्यांनी पोस्टरला चांगला प्रतिसाद दिला आहे.
गुलाबी साडी अन् शेकी-शेकीच्या भरघोष यशानंतर संजूचे नवीन गाणे प्रदर्शित! ‘पिल्लू’ गाजण्यास सज्ज
चित्रपटाची कथा काय आहे?
अनुराग कश्यपच्या ‘निशांची’ चित्रपटाची कथा दोन भावांच्या गुंतागुंतीच्या जीवनावर आधारित आहे, ज्यामध्ये दोघांचेही मार्ग वेगवेगळे असतात, परंतु त्यांचे निर्णय त्यांना नेहमीच एका वळणावर आणतात. या चित्रपटात नात्यांमधील संघर्ष पाहायला मिळणार आहे. अजय राय आणि रंजन सिंग निर्मित ‘निशांची’ या चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तिच्याशिवाय या चित्रपटात वेदिका पिंटो, मोनिका पनवार, मोहम्मद झीशान अय्युब आणि कुमुद मिश्रा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.