फोटो सौजन्य - Social Media
गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दोघेही आत त्याच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार मलायका आणि अर्जुनचे खास नाते असले तरी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ही बातमी आता सर्वत्र पसरली आहे.
एकमेकांशी बोलले नाही
आता या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान, मलायका आणि अर्जुन इंडिया कॉउचर वीक 2024 मध्ये डिझायनर कुणाल रावलच्या फॅशन शोमध्ये सहभागी होताना दिसले. मात्र, एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करत होते. दोघांचे वागणे बघता असे वाटते की कलाकारांमध्ये खरोखरच वेगळेपणा वाढला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कार्यक्रमादरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ गेले पण बोलले नाही. अर्जुन कपूर काही चाहत्यांसोबत फोटोसाठी पोज देताना दिसला, तर मलायका शांतपणे त्याच्या मागे गेली. कार्यक्रमादरम्यानही ते एकमेकांपासून लांब बसलेले नजर आले आहेत. तसेच अर्जुन कपूरने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती तर मलायका पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये चमकली होती.
एअरपोर्टवर झाले होते स्पॉट
याआधी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. दोघांमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा अंदाज चाहते बांधत होते. कदाचित ते एकत्र सुट्टीवर जात असतील. पण आता समोर आलेला व्हिडिओ पाहता, अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी केल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय दोघेही वेळोवेळी शेअर करत असलेल्या सिक्रेट पोस्ट देखील ब्रेकअपच्या अफवा वाढवतात.