Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशुतोष गोवारीकर यांच्या प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडला २० वर्ष पूर्ण, सोशल मीडियावर शेअर केली झलक!

आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड (AGPPL) ने आज एक उल्लेखनिय बाब साधली आहे. AGPPL ने भारतीय मनोरंजनसृष्टीत दोन दशके पूर्ण केली असून, आज त्यांनी २० वर्षांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 13, 2024 | 12:41 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर आणि त्यांच्या पत्नी सुनीता गोवारीकर यांनी २००४ मध्ये AGPPL ची स्थापना केली होती, आणि याचं पहिले प्रोजेक्ट ‘स्वदेश’ हा चित्रपट होता जो घर आणि मानवतेला समर्पित आहे. या दोन दशकांमध्ये, AGPPL ने अनेक समीक्षकांच्या प्रशंसेला पात्र ठरून यशस्वी चित्रपट निर्माण केले आहेत, ज्यामध्ये जोधा अकबर, खेलें हम जी जान से, मोहनजो दाड़ो आणि पानीपत यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे.

या खास प्रसंगी, AGPPL च्या टीमने सोशल मीडियावर एक विशेष ट्रेलर प्रदर्शित केला आहे, जो त्यांचा २० वर्षाचा यशस्वी प्रवास दाखवतो. या ट्रेलरमध्ये प्रोडक्शन हाऊसच्या ऐतिहासिक चित्रपटांची झलक दाखवण्यात आली आहे ज्यामधून, कला, भव्यता आणि भावना, म्हणजेच एकंदरीत आशुतोष गोवारीकर यांचे सिनेमॅटिक व्हिजन दिसून येते. हे पाहताना चाहत्यांना देखील आनंद होत आहे. अनेक चाहत्यांसह कलाकारांनी देखील या पोस्टला प्रतिसाद दिला आहे.

या विशेष दिवसाच्या निमित्ताने निर्मात्या सुनीता गोवारीकर म्हणाल्या, “AGPPL, माझं तिसरं बाळ आहे, जे २००४ मध्ये जन्मले आणि आज ते २० वर्षांचं झालं आहे. कठोर मेहनत, चांगल्या आणि वाईट काळात या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याचा प्रवास एक रोलरकोस्टर सारखा होता आणि मी त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. मागे वळून पाहताना, मला खूप अभिमान वाटतो. हे २० वर्ष सहकार्य, क्रिएटिव्हिटी आणि अनोख्या समर्पणाची असाधारण जर्नी होती आणि आम्ही भविष्यात आणखी नवे प्रोजेक्ट करण्यासाठी उत्साही आहोत.” असे त्यांनी सांगितले.

या प्रवासाविषयी व्यक्त होताना आशुतोष गोवारीकर म्हणाले की, “सुनीता आणि मी AGPPL ची सुरुवात एका स्वप्नाने केली होती, की त्याच गोष्टी मांडायच्या ज्या मनाला भिडतील आणि प्रेरित करतील. या कंपनीच्या माध्यमातून मला अनेक प्रतिभावान लोकांना भेटण्याचं आणि त्यांच्याशी सहकार्य करण्याचं भाग्य लाभलं, ज्यामुळे हा प्रवास अद्भुत बनला. २० वर्षांचा हा टप्पा अभिमान आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. हे सर्वकाही कलाकार, टेक्निशियन आणि क्रू सदस्यांच्या योगदानामुळे शक्य झालं आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या माय बाप रसिक प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो.” असे चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर म्हणाले.

Sabar Bonda: ‘साबर बोंडा’ ठरला सनडान्‍स २०२५ मध्‍ये सामील होणारा भारतातील एकमेव चित्रपट!

AGPPL प्रोडक्शन हाऊस मनोरंजन, शिक्षण आणि प्रेरणा देणाऱ्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रतिबद्ध आहे. आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्सची पहिली फीचर फिल्म ‘स्वदेश’ (२००४) होती, आणि त्यानंतर आशुतोष गोवारीकर आणि सुनीता गोवारीकर यांनी आपले स्वतःचे फिल्म प्रोडक्शन हाऊस AGPPL स्थापन केले. स्क्रीन, टेलीव्हिजन, म्युझिक आणि OTT सर्व प्लॅटफॉर्मवर कंटेंट निर्माण करण्यासाठी AGPPL ने UTV, Disney, PVR, Star Plus आणि T-Series यासारख्या प्रमुख इंडस्ट्री टॅलेंट आणि स्टुडिओसह कोलॅबरेशन केले आहे. AGPPL ने नेहमीच आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रवाद, देशभक्ती, धार्मिक सहिष्णुता, जाती व्यवस्था, महिला सशक्तीकरण, मुलींचे संरक्षण यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे, ज्याला भारत आजही तोंड देत आहे. AGPPL चित्रपटांना भारतात राष्ट्रीय पुरस्कारांसह भारतीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये देखील अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Web Title: Ashutosh gowariker productions private limited completes 20 years shared a glimpse on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 12:41 PM

Topics:  

  • Film producer

संबंधित बातम्या

‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटाशी संबंधित ‘या’ खास व्यक्तीचे निधन; ‘वॉन्टेड’, ‘दबंग’ आणि ‘रांझणा’ शीही जोडले आहे नाव
1

‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटाशी संबंधित ‘या’ खास व्यक्तीचे निधन; ‘वॉन्टेड’, ‘दबंग’ आणि ‘रांझणा’ शीही जोडले आहे नाव

दारूच्या नशेत ‘या’ निर्मात्याने भर बाजारपेठात चालवली गाडी, अनेक लोक चिरडले; एकाचा जागीच मृत्य!
2

दारूच्या नशेत ‘या’ निर्मात्याने भर बाजारपेठात चालवली गाडी, अनेक लोक चिरडले; एकाचा जागीच मृत्य!

ईडीची ‘L2: Empuraan’च्या निर्मात्यांच्या घरावर छापेमारी! कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन जप्त
3

ईडीची ‘L2: Empuraan’च्या निर्मात्यांच्या घरावर छापेमारी! कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.