(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे निर्माते असित मोदी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत आले आहे. शोमधील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. शोमधील एक्स अभिनेत्री जेनिफर मिस्त्री यांनी असितवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. असे म्हटले जाते की जेनिफरने त्याच्याविरुद्ध खटलाही दाखल केला होता. अलीकडेच तिने पुन्हा एकदा असित मोदींबद्दल अनेक खुलासे केले आहेत. जे ऐकून चाहते पुन्हा एकदा चकीत झाले आहेत.
जेनिफरने असित मोदीवर केले गंभीर आरोप
पिंकव्हिलाशी झालेल्या संभाषणात, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचा भाग राहिलेली जेनिफर मिस्त्री म्हणाली की, असित मोदी तिला किस करू इच्छित होते. जेनिफर म्हणाली, ‘स्वित्झर्लंडच्या व्हिसा समस्येमुळे मी रडू लागले होते. फोनवर असित मोदीने मला सांगितले की तू का रडत आहेस. जर तू इथे असतीस तर मी तुला मिठी मारली असती.’ असे अभिनेत्रीला ते म्हणाले असून अभिनेत्रीने याचा खुलासा आता केला आहे.
Saiyaara साठी नव्हते अहान-अनित पहिली पसंती? ‘या’ प्रसिद्ध कपलसोबत मोहित सूरी बनवणार होते चित्रपट
‘असित मोदीला चुंबन घ्यायचे होते’ – जेनिफर
जेनिफरने संभाषणात पुढे सांगितले की, ‘प्रवासादरम्यान, असित मोदी माझ्याकडे आले आणि म्हणाले की तुझे ओठ खूप चांगले आहेत. मला तुला धरून चुंबन घ्यायचे आहे.’ जेनिफर म्हणाली की तिने शोमध्ये भिडेची भूमिका करणाऱ्या मंदार चांदवडकरला याबद्दल सांगितले पण त्याने याबद्दल काहीही सांगितले नाही.
व्हिस्की पिण्याची ऑफर दिली
जेनिफर मिस्त्री यांच्या मते, २०१९ च्या सुरुवातीला सिंगापूरमध्ये शूटिंग दरम्यान, असित मोदी तिच्या खोलीत आले आणि अभिनेत्रीला त्यांच्यासोबत व्हिस्की पिण्याची ऑफर दिली. अभिनेत्री म्हणाली की त्यांनी हे केले कारण जेणेकरून मला कंटाळा येऊ नये.’ असे गंभीर आरोप अभिनेत्रीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ दिग्दर्शक असित मोदींवर केले आहे.
फराह खान Cloud 9 वर, बिग बींकडून खास भेट, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘मी मस्करीत म्हटले पण….’
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेबद्दल
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टीव्ही शो जुलै २००८ पासून प्रसारित झाला. त्याची निर्मिती नीला असित मोदी आणि असित कुमार मोदी यांनी केली आहे. या मालिकेची कथा मुंबईतील गोकुळधाम सोसायटीची आहे, जिथे वेगवेगळ्या ठिकाणचे, संस्कृतीचे आणि परंपरांचे लोक एकमेकांसोबत आनंदाने राहतात. आणि सोसायटीमध्ये घडणाऱ्या घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळतात.