अजय देवगण आणि तब्बू स्टारर बहुप्रतिक्षित चित्रपट ‘औरों में कहाँ दम था’ बद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट यापूर्वी 5 जुलै 2024 रोजी रिलीज होणार होता. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अखेर या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांनी ‘औरों में कहाँ दम था’ ची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. ज्याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता होती.
‘औरों में कहाँ दम था’2 कधी रिलीज होणार?
‘औरों में कहाँ दम था’ ची निर्मिती कंपनी फ्रायडे फिल्मवर्क्सने 3 जुलै रोजी इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली होती आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली होती. नोटवर “नवीन रिलीज डेट लवकरच जाहीर केली जाईल” असेही लिहिले होते. तेव्हापासून चाहते निर्मात्यांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्याची वाट पाहत होते आणि आज अखेर चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
अजय आणि तब्बूने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून त्याची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. यामध्ये हा चित्रपट 2 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. असे दिसत आहे. तसेच या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “2 ऑगस्टला प्रतीक्षा संपेल! ” असे या शेअर केलेल्या पोस्ट मध्ये दिसत आहे.
‘और में कौन दम था’ स्टार कास्ट
याचा अर्थ असा की चित्रपटगृहांमध्ये रोमँटिक थ्रिलर पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी एक महिना वाट पाहावी लागणार आहे. नीरज पांडे दिग्दर्शित ‘औरों में कहां दम था’ मध्ये अजय देवगण आणि तब्बू यांच्यासोबत जिमी शेरगिल, शंतनू माहेश्वरी आणि सई मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रोमँटिक थ्रिलर कृष्णा (अजय) आणि वसुधा (तब्बू) या पात्रांभोवती फिरते, जे 22 वर्षे विभक्त झाल्यानंतर पुन्हा एकमेकांना भेटतात. यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
अजयच्या चित्रपटाची टक्कर विक्रांत मॅसीच्या चित्रपटाशी होणार
अजय देवगणच्या ‘औरों में कहाँ दम था’ या चित्रपटाची नवीन रिलीज डेट 2 ऑगस्ट जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट विक्रांत मॅसीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’शी टक्कर देणार आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतात आणि कोण कोणावर विजय मिळवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.