आयुष्मान खुराना आणि पश्मिना रोशनचे नवीन गरबा गाणं "जचडी" झाले लाँच (फोटो सौजन्य-Social Media)
आयुष्मान खुराना आणि पश्मिना रोशन यांचे नवीन गरबा गाणे “जचडी” आज रिलीज झाले आहे, अगदी नवरात्रीच्या सेलिब्रेशनसाठी हे गाणं तयार करण्यात आले असून, चाहते या गाण्यावर नक्कीच थिरकणार आहे. आयुष्मान खुरानाने गायलेल्या या गाण्यात पश्मिना रोशनही दिसत आहे. हे गाणे नवरात्रीच्या उत्सवासाठी तयार करण्यात आलेले एक परिपूर्ण गीत आहे. आयुष्मान आणि पश्मिना यांचा अभिनय आणि उत्तम केमिस्ट्री यामुळे हे गाणे आणखी खास बनले आहे. आता त्यांचे चाहते त्यांना चित्रपटात पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
हे गाणे अष्टपैलू कलाकार आयुष्मान खुरानाने गायले आहे आणि त्यात अभिनेत्री पश्मिना रोशन देखील झळकली आहे, अभिनेत्रीने या वर्षी निपुण धर्माधिकारी यांच्या “इश्क विश्क रिबाउंड” या चित्रपटामधून पदार्पण केले आहे. आणि आता नुकतेच ती या गाण्यात चमकणार आहे. हे गाणे एक डान्स ट्रॅक असून, हे गाणं चाहत्यांना वेडे करणार आहे. हे गाणं ऐकू गरबाप्रेमी अचानक थिरकायला लागतील यात शंकाच नाही.
अभिनेत्री या गाण्यामधील उत्साह व्यक्त करताना पश्मिना म्हणाली, “जचडी हे गाणे करणे हा एक अद्भुत अनुभव होता. सेटवरची ऊर्जा पूर्णपणे वेगळी होती आणि आयुष्मान आणि संपूर्ण टीमसोबत काम करणं हा एक विशेषाधिकार होता. या अनुभवातून मी खूप काही शिकले आणि त्याबद्दल मी खूप आभारी आहे. नवरात्री नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळील उत्सव आहे. हा संगीत, नृत्य आणि कुटुंब आणि मित्रांसोबत उत्सवाचा काळ आहे. तोच आनंद या गाण्यात दिसून येतो. लहानपणी मित्रांसोबत गरबा खेळायचो आणि या निमित्ताने जचडीने त्या आठवणी परत निर्माण केल्या आहेत. प्रत्येकजण या नवरात्रीचा धमाकेदार अनुभव पुन्हा घेऊ शकेल आणि तोच आनंद अनुभवू शकेल याबद्दल मला खूप आनंद आहे.” असे अभिनेत्रीने सांगितले.
हे देखील वाचा- पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर संगीत उद्योजक अंशुल गर्गच्या संगीताची आहे चाहते!
“जचडी” ही गरब्याची उर्जा आणि उत्साह टिपणारी एक उत्तम गीत आहे. व्हिडिओमध्ये जबरदस्त कोरिओग्राफी आणि जबरदस्त व्हिज्युअल आहेत जे नवरात्रीचा आनंद उत्तम प्रकारे कॅप्चर करतात. आयुष्मान आणि पश्मिना यांच्या दमदार कामगिरीमुळे हे गाणे जिवंत झाले आहे, जे डान्स फ्लोअरवर हिट होण्यासाठी तयार आहे आणि प्रत्येक नवरात्रीच्या प्लेलिस्टमध्ये जोडले आहे. हे गाणे सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, आणि व्हिडिओ आयुष्मान खुरानाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर पाहता येईल. चाहते आधीच आयुष्मान आणि पश्मिनाची केमिस्ट्री आणि गाण्याच्या एनर्जीची प्रशंसा करत आहेत.