(फोटो सौजन्य- Xअकाउंट)
सलमान खानच्या ‘बिग बॉस 18’ या शोमध्ये सध्या चांगलाच गोंधळ सुरू आहे. शो सुरू होऊन 10 दिवस उलटले आहेत आणि इतक्या कमी कालावधीत काही घरातील सदस्य एकमेकांचे शत्रू झाले आहेत. बिग बॉसच्या घरात भांडणे पाहणे हे काय बिग बॉस प्रेमींना नवीन नाही आहे. प्रत्येक आठवड्यात स्पर्धक रेशनसाठी एकमेकांशी स्पर्धा करताना दिसले आहेत. या आठवड्यातही स्पर्धकांमध्ये रेशनसाठी लढा सुरू झाला आहे. नुकताच बिग बॉस 18 चा प्रोमो रिलीज झाला, ज्यामध्ये अविनाश मिश्रा आणि शिल्पा शिरोडकर यांच्यात वाद झालेला दिसला. दोघांमधील भांडण सध्या चर्चेत आहे. आता घरात आणखी एक भांडण सुरू आहे. अविनाश मिश्रा आणि चुम दरंग यांच्यात ही मोठे भांडण झाले आहे. दोघांमधील वाद इतका वाढला की एकाने दुसऱ्याला शिवीगाळही केली आहे.
‘बिग बॉस 18’ मध्ये झाले सदस्याचे गैरवर्तन
रेशनवरून अविनाश आणि चुम यांच्यात जोरदार भांडण झाले. दोघांमधील वाद इतके वाढले की चुमने अविनाशला शिवीगाळही केली. हे दृश्य पाहून घरातील सदस्य आश्चर्यचकित झाले. त्याचवेळी अविनाशला शिवीगाळ ऐकून तोही चक्रावला. यानंतर बिग बॉसने सर्व सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावले आणि घरातील सर्व सदस्यांशी बोलले. यादरम्यान, पहिल्या दिवसापासून आपले नाव खराब करणाऱ्या स्पर्धकाच्या वागणुकीबद्दल कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.
हा स्पर्धक आला घराबाहेर
अलीकडेच एक बातमी आली होती की वकील गुणरत्न यांना शोमधून बाहेर फेकण्यात आले आहे. त्याच्यानंतर आता बिग बॉसने आणखी एका स्पर्धकाला घरातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने अविनाश मिश्राला घरातून बाहेर काढण्याचा आदेश दिल्याचे पाहायला मिळणार आहे. यानंतर अविनाश भावूक होतो. मात्र, तो प्रत्यक्षात घराबाहेर जाणार की वाइल्ड कार्ड म्हणून परत येणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. अविनाशची एक्झिट आजच्या एपिसोडमध्ये दाखवली जाणार आहे.
Tomorrow Promo #BiggBoss18: Avinash get EVICTED from house bcz of HMs votes.pic.twitter.com/OEQyxLRMMi
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 15, 2024
हे देखील वाचा- धूम्रपान करणारा ‘नंदू’ आता चित्रपटगृहात दिसणार नाही? CBFC ने हटवली अक्षय कुमारची ‘ही’ जाहिरात!
आतापर्यंत दोन सदस्य आले घराबाहेर
बिग बॉस 18 मधून बाहेर काढण्यात आलेला गधराज हा पहिला सदस्य होता. पेटाच्या नोटीसनंतर निर्मात्यांनी त्याला शोमधून बाहेर काढले. तर, आता गधराजनंतर खऱ्या स्पर्धकांपैकी गुणरत्न सदावर्ते यांना शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. आणि आज अविनाश मिश्राला घराबाहेर जाणार आहे.