फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 तिकीट टू फिनाले : आता बिग बॉस १८ चा फिनाले फक्त १ आठवडा दूर आहे, स्पर्धा खूपच कठीण आणि मनोरंजक होत चालली आहे. घरातले सदस्य आता एकमेकांवर समोरून वार करायला चुकत नाहीत. आता स्पर्धा कठीण होणार आहे आणि फिनालेमध्ये जागा पक्की करण्यासाठी बिग बॉस सदस्यांसमोर नवे आव्हान उभे करणार आहे. अलीकडेच, घरात एक टास्क झाला ज्यामध्ये दोन स्पर्धक फिनालेच्या तिकिटासाठी स्पर्धक बनले. फिनालेचे तिकीट जिंकणारा स्पर्धक थेट फिनाले आठवड्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळेच बिग बॉसचा हा खेळ आणखीनच मजेशीर होत आहे.
सोशल मीडियावरून खबरी पेजवरून सांगण्यात आले आहे की, बिग बॉसच्या घरामध्ये आता तिकीट टू फिनालेची स्पर्धा सुरु झाली आहे. यामध्ये बिग बॉसच्या तिकीट टू फिनालेशर्यतीचे पहिले दोन सदस्य प्रेक्षकांना मिळाले आहेत. तिकीट टू फिनालेच्या शर्यतीमध्ये चुम दारंग आणि विवियन डिसेना हे दोन स्पर्धक एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.
Bigg Boss 18 : करण- शिल्पाच्या मैत्रीत दुरावा, म्हणाला – मला ही दोन दगडावरची मैत्री…
बिग बॉस १८ मध्ये एक टास्क आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये स्पर्धकांना शक्य तितकी अंडी गोळा करायची होती. त्यांना ही अंडी टास्क डायरेक्टर रजत दलाल आणि श्रुतिका यांच्याकडून गोळा करायची होती. या टास्कमध्ये करणवीर मेहराने एकूण ७ अंडी गोळा केली पण त्या अंड्यांवर त्याने चुमचे नाव लिहिले. विवियनने त्याच्या नावावर ७ अंडी देखील जमा केली. तर अविनाशने प्रयत्न करून फक्त ३ अंडी गोळा केली. चुम आणि विवियन हे टास्क जिंकून दोन स्पर्धक बनले.
Vivian: 7 eggs
Karan: 7 eggs (on behalf of Chum)
Avinash: 3 eggs Most likely, Vivian and Chum will become the contenders for the Ticket To Finale (TTF)… Let’s see..bas Bigg Boss kuch interfare na kare….. 😑#BiggBoss18 — Livefeed Updates (@BBossLivefeed) January 6, 2025
मोठी गोष्ट म्हणजे फिनालेच्या फक्त एक आठवडा आधी करणवीरने चुमला त्याच्या जागी फिनालेच्या तिकिटासाठी स्पर्धक बनवले. चुमच्या नावाने अंडी गोळा करून त्याने तिला दावेदार बनवले. आता यामध्ये घरातला पहिला फायनॅलिस्ट कोण होणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.
या टास्कसाठी नामांकित स्पर्धकांना संचालक बनवण्यात आले होते, या आठवड्यामध्ये श्रुतिका अर्जुन, रजत दलाल आणि चाहत पांडे हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. ज्यात श्रुतिका आणि रजत दलाल यांचा समावेश होता. या दोघांना बिग बॉसने या टास्कचे संचालक बनवले होते. साहजिकच चुमची स्पर्धक बनण्यात श्रुतिकाचीही महत्त्वाची भूमिका होती.
चुम दारंग हा घरातील एक मजबूत सदस्य आहे यामध्ये इतर गटातील लोकही कौतुक करतात. प्रत्येकजण त्याच्या स्वच्छ मनाची आणि चांगल्या हेतूची प्रशंसा करतो. म्हणूनच त्याचे द्वेष करणारे फार कमी आहेत. चुम फिनालेच्या तिकिटाचा दावेदार होण्यामागे हेही एक मोठे कारण आहे. त्याचबरोबर तिने सीझनमधील मुलींमध्ये सर्वात चांगले टास्क खेळले आहेत. एवढेच नव्हे तर ती तिची मत देखील स्पष्ट ठेवली आहेत.