फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १८ : सध्या देशात चर्चेत असलेला टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस १८ मधील घरातले स्पर्धक प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहेत. या आठवड्यातून एलिस कौशिकचा पत्ता कट होणार आहे. या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये एलिस कौशिक हिला प्रेक्षकांची कमी मते मिळाल्यामुळे तिला घराबाहेरच रस्ता दाखवण्यात आला. त्याआधी आता बिग बॉस सिझन ११ ची उपविजेती हिना खान आज बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री करणार आहे. त्यामुळे आता बिग बॉस एक हिना खानचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये आता हिना खान तिच्या निशाण्यावर बिग बॉस १८ ची स्पर्धक शिल्पा शिरोडकर ला घेणार आहे.
मागील आठवड्यामध्ये नॉमिनेशनची प्रक्रिया झाली होती, यामध्ये टाइम गॉड रजत दलाल अधिकार देण्यात आला होता. यावेळी त्याने शिल्पाला ५ स्पर्धकांना नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला होता. यावेळी शिल्पाने स्वतःच्याच मित्राला करणवीर मेहराला नॉमिनेट केले होते आणि त्यामुळे सोशल मीडियावर देखील मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेवरून शिल्पा शिरोडकर सोशल मीडियावर ट्रॉल देखील करण्यात आले होते. आता याच घटनेवरून हिना करणला प्रश्न करणार आहे.
बिग बॉस 18 संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
एकीकडे हिना खान तिचा मित्र करण वीर मेहराला बिग बॉस 18 मध्ये सपोर्ट करते, तर दुसरीकडे ती त्याला शिल्पाबाबतचे सत्यही दाखवते. प्रदर्शित झालेल्या प्रॉमोमध्ये हिना करणवीर मेहराला म्हणते की, ‘करण तू स्वतःची बाजू का घेत नाहीस? इतर जे काही तुझ्यासोबत करत आहेत ते तुम्ही करू शकत नाही.’ यानंतर हिना शिल्पाविषयी म्हणते, ‘सोयीची ही मैत्री दिसत आहे. जेव्हा शिल्पाने तुला नॉमिनेट केले. माझा मूड खूप खराब झाला होता. मला हे वाटलं, मी एक्का खेळेन, मी काही मोजणी केली आहेत, मी खेळ खेळेन, तू तुझ्या मित्राशी हे करू शकत नाहीस. पुढे हिना करणला म्हणते की, जर तू माझा मित्र आहेस तर तू हे माझ्यासोबत केले नसते.
#WeekendKaVaar Promo- Khulegi sabki nafrat ek dossre ke liye. Hina Khan ne diye REALITY CHECK to Karanveerpic.twitter.com/X8JYqEDhDX
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 23, 2024
बिग बॉस 18 मध्ये हिना खान पाहुणी म्हणून आली होती. सलमान खानने हिनाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यादरम्यान हिना म्हणाली, ‘या सुंदर प्रवासातून मी माझ्यासोबत घेतलेली गोष्ट म्हणजे ताकद. मला या शोमध्ये एक अतिशय सुंदर टॅग मिळाला आहे. संपूर्ण जग मला ‘शेरखान’ म्हणून ओळखते. हिनाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सलमान म्हणतो, ‘तू नेहमीच फायटर आहेस आणि इथे प्रत्येक आव्हानाचा सामना करत आहेस. तुला एक हजार टक्के दंड होईल.’ सलमानचे बोलणे ऐकून हिनाच्या डोळ्यात पाणी आले.