फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : सलमान खान होस्ट केलेला बिग बॉस 18 हा सध्या प्रेक्षकांचा खूप आवडता रिॲलिटी शो बनला आहे. या शोमध्ये दररोज नवनवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत. कोण कोणाचा मित्र कधी होईल आणि कोण शत्रू होईल हे सांगणे सध्या फार कठीण आहे. अलीकडे पत्नी नूरन अलीला भेटल्यानंतर विवियन खूपच बदललेला दिसत आहे. त्याने शिल्पा शिरोडकरसोबतची मैत्री पूर्णपणे संपवली आहे. नुकतेच जिथे त्याने शिल्पाला घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेट केले. त्याचवेळी, आता त्यांनी या सदस्याला सुरक्षित करण्यासाठी सारा अरफीन खानला नॉमिनेट केले आहे.
या आठवड्यामध्ये घराची नवी टाइम गॉड कालच्या भागामध्ये श्रुतिका अर्जुन झालेली आहे. यामध्ये आता अनेक नात्यांमध्ये बदल पाहायला मिळाला आहे. या आठवड्यामध्ये आठ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये करणवीर मेहरा, यामिनी मल्होत्रा, दिग्विजय राठी, शिल्पा शिरोडकर, चुम दारंग, रजत दलाल, चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन हे घराबाहेर जाण्यासाठी सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
Bigg Boss 18 : करणवीर मेहरामुळे विवियन डिसेना मोडणार शिल्पासोबतचं नातं?
बिग बॉस 18 च्या नॉमिनेशन आठवड्याचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये विवियन डिसेनाचा संपूर्ण खेळ बदललेला दिसत आहे. जेव्हा बिग बॉसने विवियनला नॉमिनेट स्पर्धकांपैकी एकाला सुरक्षित करण्याची संधी दिली तेव्हा त्याने यामिनी मल्होत्राला सुरक्षित केले आणि सांगितले की त्याला सारा अरफीन खानला नॉमिनेट करायचे आहे. साराला नॉमिनेट करण्यामागील कारण स्पष्ट करताना विवियन म्हणाला की तिचा खेळ दिसत नाही, ती फक्त आवाज करत नाही आणि नको त्या विषयांवर बोलत राहते.
विवियनला हवे असते तर तो यामिनीऐवजी शिल्पाला नॉमिनेशनपासून वाचवू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. विवियनच्या या निर्णयामुळे शिल्पा संतापली. ती विवियनवर ओरडते आणि म्हणते, ‘आज तू यामिनीला वाचवलेस, त्यामुळे तू पूर्णपणे गोंधळलेला आहेस.’ यावर विवियन म्हणतो, ‘तुला यामिनीसोबत काही अडचण आहे का?’ हे ऐकून शिल्पा म्हणाली, ‘मला यामिनीसोबत काही अडचण नाही, मला तुझ्यासोबत समस्या आहे, कारण तू ७० दिवसांच्या नात्याची तुलना २० दिवसांच्या नात्याशी केली आहेस. अशा परिस्थितीत करणवीर मेहरा म्हणाला, ‘विवियन डिसेनाने यामिनीला वाचवण्यामागे एक कारण आहे. कारण ते घाबरले आहेत. करणला प्रत्युत्तर देताना विवियन म्हणाला, तुझे विचार माझ्याशी जुळत नाहीत आणि माझ्यासाठी काही उपयोगाचे नाहीत.
त्यानंतर कशिश कपूर श्रुतिका अर्जुन वाचवून रजत दलालला नॉमिनेशनमध्ये टाकताना दिसत आहे. त्यानंतर आता कशिशवर रजत दलाल रागावताना दिसला आता आगामी भागामध्ये काय होणार हे पाहणं मनोरंजक होणार आहे. या आठवड्यामध्ये कोणते सदस्य घराबाहेर जाणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल.