फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : टेलिव्हिजनवरचा चर्चित शो बिग बॉस १८ फिनालेच्या दिशेने वेगाने जाताना दिसत आहे. त्याचबरोबर बिग बॉस 18 ची प्रेक्षकांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. जसजसा फिनाले जवळ येत आहे, तसतसा बिग बॉस स्पर्धकांसाठी सापळा रचत आहे. त्याचबरोबर स्पर्धकही विजयाच्या जवळ जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत तिजेंदर पाल सिंग बग्गा यांना कमीत कमी मते मिळाल्याने शोमधून बाहेर करण्यात आले आहे. दरम्यान, शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये विवियन डिसेनाने तिचा गेम पूर्णपणे बदलला आहे, जे पाहून सर्व घरातील सदस्य आश्चर्यचकित झाले आहेत.
बिग बॉस 18 चा नवा प्रोमो समोर आला आहे. आगामी भागामध्ये बिग बॉसच्या स्पर्धकांसमोर नॉमिनेशनचे संकट असणार आहे. प्रोमोमध्ये विवियन नॉमिनेशन राऊंडमध्ये टेबल फिरवताना दिसला. त्यांनी येताच करणवीर मेहराला नॉमिनेट केले. व्हिडिओमध्ये विवियन म्हणतो, ‘माझं पहिलं नाव करण असेल, फ्रेनीमी आणि शत्रुत्व त्यामुळे मी स्पष्ट करतो की मी तुझा मित्र नाही.’ विवियनने दुसरे नाव शिल्पा शिरोडकर घेतले. तो म्हणाला, ‘माझे दुसरे नाव शिल्पा जी असणार आहे. माझ्या मते त्यांच्यात स्पष्टता नाही. यावर करण वीर म्हणतो की हे पन्नास दिवस असेच गेले. हे ऐकून विवियन म्हणतो की, जर त्याला करण हवा असेल तर त्याचा करण तुमच्याकडे ठेवा. अलीकडेच विवियनची पत्नी नूरन हिने त्याला करण आणि शिल्पाबाबतचे सत्य सांगितले आहे.
#BiggBoss18 PROMO TOMORROW NOMINATION TASK | Vivian ON FIRE | #VivianDsena Ne Kiya #KaranveerMehra aur #ShilpaShirodkar Ko NOMINATE pic.twitter.com/dwLB1mw7DF
— BiggBoss24x7 (@BB24x7_) December 15, 2024
कालच्या भागामध्ये दाखवण्यात आले होते की, विवियन डिसेनाची पत्नी त्याला फीडबॅक देण्यासाठी घरामध्ये आली होती. यावेळी ती म्हणाली होती की, कसा आहेस, तुला तुझ्याबद्दल काय वाटत आहे? काय चाललं आहे. त्यानंतर विवियन म्हणतो की, सर्वात आधी मला सांग काय झालं आहे का? मी खूप आभारी आहे की, हे सगळं आता होत आहे. यावर त्याची पत्नी म्हणते की, नक्की काय होत आहे मला सांग? मला जाणून घ्यायचं आहे तू कशाबद्दल बोलत आहेस. मी आज थोडासा त्रासलेलो आहे. यावर त्याची पत्नी त्याला म्हणते की, फक्त आजच तू परेशान आहेस का? यावर तो म्हणतो की,मला या गोष्टीची जाणीव काही दिवसांपूर्वीच झाली आहे. मग तू तुझा आवाज कुठे आहे?
Bigg Boss 18 : आईला पाहून रजत दलाल भावुक! दिग्विजय राठीपासून दूर राहण्याचा दिला सल्ला
पुढे त्याची पत्नी म्हणते की, मग तू बोलत का नाही आहेस? तुला कोण थांबवत आहे? तुझे जे विचार आहेत ते तू का सांगत नाही आहेस. तुझे सगळे फॅन्स तुला बघत आहेत. संपूर्ण घर तुला बघत आहे, तू एवढा मागे का राहिला आहेस? तू तू नाही आहेस विवियन कुठे आहे? तुला तुझ्या व्यक्तिमत्वाची काळजी आहे का? मला माहिती आहे की, तुला अजिबात फरक पडत नाही की तूला लोक काय बोलतील त्याचा तुला फरक पडत आहे. तू नेहमी स्वतःला वर ठेवले आहेस. तू तुझ्या आयुष्यामध्ये यापेक्षा जास्त कठीण काळ पहिला आहेस. तू मला वाचन दिले होतेस इकडे येण्याआधी की तू ट्रॉफी घरी घेऊन येणार आहेस.
यावर विवियन डिसेना म्हणतो की, मला कळत नाही आहे आणि कदाचित माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होते आणि मी भांडण आणि वाद दुर्लक्षित करत होतो. यावर विवियन डिसेनाची पत्नी त्याला सांगते की, करण तुझा मित्र नाही आहे आणि त्याने बऱ्याच गोष्टी शोमध्ये सांगितल्या आहेत. त्यामुळे तू एकटा खेळ तुझा इथे फायदा उचलला जात आहे. तुला बाहेरचे लोक स्पाइनलेस म्हणत आहेत तू आहेस का असा?