फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मिडीया
टॉप 10 कलाकार : नुकताच बिग बॉस १८ विजेता भारताला मिळाला आणि या स्पर्धेचा विजेता करणवीर मेहरा ठरला. सोशल मीडियावर करणवीर मेहराला विजेता घोषित केल्यानंतर बऱ्याच जणांना धक्का बसला होता. बिग बॉस १८ च्या फिनालेमध्ये ६ स्पर्धक होते यामध्ये टॉप ३ स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरू होती. टॉप ३ स्पर्धकांमध्ये करणवीर मेहरा, विवियन डीसेना आणि रजत दलाल हे स्पर्धक होते. यामध्ये तिसऱ्या स्थानावर रजत दलाल बाद झाला आणि सर्वानाच धक्का बसला. कारण बिग बॉस ओटिटी सिझन २ चा विजेता त्याचबरोबर आणि युट्यूब इन्फ्लुसरचां त्याला पाठिंबा होता आणि तो टॉप २ मध्ये असणार हे जवळजवळ सर्वानाच वाटत होते. परंतु असे झाले नाही आणि तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
त्यानंतर टॉप २ मध्ये विवियन डीसेना आणि करणवीर मेहरा होते, यामध्ये करणवीर मेहराने त्याच्या खेळाने सुरुवातीपासूनच चाहत्यांची मन जिंकली होती. विवियन डीसेना हे टेलिव्हिजनचे मोठे नाव आहे परंतु तो शोमध्ये फार मोठी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे करणवीर मेहरा शो जिंकण्याचे सुरुवातीपासूनच चान्स जास्त होते. आता सोशल मीडियावर या आठवड्यामधील टॉप १० टेलिव्हिजनवरील कलाकारांची यादी समोर आली आहे यावर एकदा नजर टाका.
अभिनेत्री आशिता धवन आणि रजत दलाल यांच्यात सोशल मीडिया वॉर! नक्की प्रकरण काय?
सोशल मीडियावर गॉसिप टीवीने सोशल मीडियावर एक यादी शेअर केली आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर बिग बॉस १८ चां विजेता आणि अभिनेता करणवीर मेहरा आहे. तर दुसऱ्या स्थानावर बिग बॉस १८ चां उपविजेता विवियन डीसेना आहे. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर बिग बॉस खेळामध्ये तिसऱ्या स्थानावर अविनाश मिश्रा आहे. चर्चित शोच्या तीनही स्पर्धकांनी पहिल्या तीन स्थानावर कब्जा केला आहे. ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतील अभिनेत्री समृध्दी शुक्ला या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे, तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. तर पाचव्या क्रमांकावर या यादीमध्ये बिग बॉस १८ ची स्पर्धक आणि प्रसिद्ध अभिनेत्री ईशा सिंह आहे.
The Top 10 HINDI TV Actors that generated the MOST BUZZ WEEK 03,2025
1.#KaranveerMehra (BB18)
2.#VivianDsena (BB18)
3.#AvinashMishra (BB18)
4.#SamridhiiShukla (YRKKH)
5.#EishaSingh (BB18)
6.#BhavikaSharma (GHKKPM)
7.#AyeshaSingh (Mannat)
8.#RupaliGanguly (Anupama)…— GossipsTv(GTv) (@GossipsTv) January 22, 2025
टॉप १० कलाकाराच्या यादीमध्ये सहाव्या स्थानावर गुम है किसी के प्यार में मालिकेची अभिनेत्री भविका शर्मा आहे. मन्नत मालिकेतील आयेशा सिंह या यादीमध्ये सातव्या स्थानावर आहे. तर आठव्या स्थानावर या यादीमध्ये टेलिव्हिजन वरची प्रसिद्ध मालिका अनुपमा सिरीयल मधील रुपाली गांगुली आहे. नवव्या स्थानावर ये रिश्ता क्या कहलाता है मलिकेमधील मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता रोहित पुरोहित आहे. तर दहाव्या स्थानावर या यादीमध्ये गुम है किसी के प्यार में मालिकेमधील हितेश भारद्वाज दहाव्या स्थानावर आहे.