
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सलमान खानचा रिॲलिटी शो “बिग बॉस १९” अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शोचा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर रोजी होणार आहे. या दिवशी, एक स्पर्धक “बिग बॉस १९” ट्रॉफी उचलताना दिसेल. मालती चहरच्या अलिकडेच बाहेर पडल्यानंतर, टॉप पाच फायनलिस्ट मिळाले आहेत.बिग बॉस हा भारतातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोपैकी एक आहे आणि टॉप पाच फायनलिस्टमध्ये अमाल मलिक, फरहाना भट, प्रणीत मोरे, तान्या मित्तल आणि टिकट टू फिनालेचा विजेता गौरव खन्ना आहेत, ज्यांनी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे.
मालती चहर अंतिम फेरीपूर्वीच बाहेर पडली आहे.निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आठवड्याच्या मध्यात झालेल्या एलिमिनेशन टास्कनंतर हे एलिमिनेशन झाले. मालती चहरला खूप कमी मते मिळाली, म्हणजेच तिचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. हे लक्षात घ्यावे की मालती चहरने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून प्रवेश केला होता, परंतु तिच्या खेळाला प्रेक्षकांकडून विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, बिग बॉसच्या घरात फक्त पाच स्पर्धक उरले आहेत, जे विजेते होण्यासाठी एकमेकांशी जोरदार स्पर्धा करताना दिसतात.
मालती चहर आणि प्रणितचे भांडण
बिग बॉस 19मध्ये झालेल्या या एलिमिनेशपूर्वी मालती, प्रणित आणि गौरव यांच्यात मस्ती सुरू असते.त्यावेळी मालत प्रणितला गौरवविषयी सांगते की, तुझ्यामुळे स्ट्रॅटजी करू शकला, त्याला इथे आल्यावरच समजले होते की, या लोकांना अक्कल नाही, या लोकांचा वापर केला जाऊ शकतो. प्रणित प्रेक्षकांना आवाहन करतो की, मालतीला घराबाहेर काढा. त्यावेळी मस्करीमध्ये मालती प्रणितला मारते. प्रणितही मालतीला धक्का देतो. त्यानंतर प्रणित मालतीला लाथ मारून घरा बाहेर काढल्याची फक्त कृती करतो. हे सगळे गंमतीत सुरू असताना लाथ मारण्याची कृती मालतीला अजिबात पटत नाही आणि ती खूपच चिडते.
गौरव प्रणितला सांगतो की, त्याने जरी केवळ अॅक्शन केली असली तरी, तिला हलका पाय लागला आहे. प्रणितला त्याची चूक लक्षात आल्यानंतर तो मालतीची माफीही मागतो. पण मालती त्याला माफ करत नाही. या सगळ्या प्रकारानंतर एलिमिनेशन टास्क होतो आणि ज्यात मालती घराबाहेर जाते. घराबाहेर जाताना ती सर्वांची गळाभेट घेते किंवा हात मिळवते. मात्र ती गौरव आणि प्रणितला अजिबात माफ करणार नाही असं सांगून जाते.तर वाइल्ड कार्ड म्हणून आल्यानंतर मालतीची घरामध्ये केवळ प्रणितसोबत मैत्री होते आणि त्यामुळे जाता जाता तिने माफ न केल्याने प्रणित टॉप 5 मध्ये गेल्याचा आनंद साजरा करत नाही.
पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटात अभिनेत्याची लक्षवेधी भूमिका!
हे स्पर्धक बिग बॉस १९ च्या टॉप ५ मध्ये असू शकतात
गौरव खन्ना
फरहाना भट्ट
अमाल मलिक
तान्या मित्तल
प्रणित मोरे
बिग बॉस १९ चा विजेता या दिवशी जाहीर होईल
ग्रँड फिनाले ७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता जिओ हॉटस्टार आणि जिओ सिनेमावर प्रसारित होईल, तर टीव्ही प्रेक्षक तो कलर्स टीव्हीवर पाहू शकतील. निर्मात्यांनी अलीकडेच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान म्हणाला, “७ डिसेंबर ही सर्वात भव्य रात्र असेल कारण बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले होणार आहे. विजेत्याचा मुकुट कोणाला चढवला जाईल आणि कोणाचे भाग्य निश्चित होईल, हे सर्व उघड होईल.