(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर या दोघींमध्ये वादाची ठिणगी पडली होती. निक्कीने वादग्रस्त वक्तव्य करून वर्षा यांचा अपमान केला होता. त्यामुळे या दोघींचं घरात शेवटपर्यंत एकमेकींशी पातळ नाही. आणि त्यांच्यात सतत वाद होऊ लागले. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून निक्की आणि वर्षा भांडताना दिसायच्या. कधी किचनवरून, कधी कॅप्टन्सी टास्क, तर अनेकदा दोघींमध्ये अशीच विनाकारण भांडणं देखील होताना दिसायची.
‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन संपून आता जवळपास ४ महिने पूर्ण झाले आहे. तरीही या दोघींची चर्चा अजूनही सुरूच आहे. दोघीही आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. घरात फॅमिली वीकमध्ये वर्षा यांची बहीण सर्वांना भेटण्यासाठी आली होती. यावेळी ‘निक्की या घरातील खलनायिका आहे’ अशी ओळख वर्षा उसगांवकरांनी तिची आपल्या बहिणीला करून दिली. हाच किस्सा त्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितला. वर्षा उसगांवकरांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच निक्कीने संताप अनावर करून एक पोस्ट शेअर केली आहे.
स्वप्नीलच्या सुपरहिट ‘मितवा’ चित्रपटाला १० वर्ष पूर्ण; चित्रपट चाहत्यांसाठी आजही आहे तितकाच खास!
वर्षा उसगांवकर या व्हिडीओमध्ये म्हणतात, “निक्कीला मी सीझन ५ ची खलनायिका म्हणायचे. एक दिवस माझी बहीण बिग बॉसच्या घरात आली तेव्हा मी निक्कीची ओळख सीझन ५ ची खलनायिका अशी करून दिली होती. मग, रात्री ती मला म्हणाली… ताई, तुम्ही मला खलनायिका बोललात ते मला आवडलं नाही. मग, मी तिला सॉरी म्हणाले… पण, तू ज्याप्रकारे माझ्याशी वागलीस त्यावरून तुला नायिका थोडीच बोलणार…दिसते नायिकेसारखी आणि वागते खलनायिकेसारखी…” असं वर्षा उसगांवकर या व्हिडीओमध्ये सांगत आहे. निक्कीने हाच व्हिडीओ स्वत:च्या इन्स्टाग्रामवर शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.
निक्की यावर स्पष्ट उत्तर देत लिहिते, “त्या मला खलनायिका म्हणाल्या…याबद्दल त्यांनी माझ्यासमोर दिलगिरी व्यक्त केली होती. त्या जे काही म्हणाल्या त्याचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यांना ज्या क्षणी स्वत:ची चूक समजली, त्या क्षणाला त्यांनी माफी मागितली. मग अशी दुटप्पी भूमिका कशासाठी? लोकांबद्दल जरा कमी बोला आणि मॅडम जरा स्वत:बद्दल बोलून आपलं घर चालवा.” असं लिहून अभिनेत्री निक्कीने ही पोस्ट शेअर केली आहे.
Chhaava: चित्रपटाच्या यशासाठी विकी कौशल पोहचला महाकुंभात; ‘छावा’ला पहिल्याच दिवशी मिळेल का प्रतिसाद?
दरम्यान, बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपला तरीही निक्कीचे अनेकांशी वाद सुरूच असतात. यापूर्वी आर्या आणि तिच्यात पुन्हा एकदा वाद झाला होता. यावेळी निक्कीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आर्याला सुनावले होते. आणि यामुळे निक्की पुन्हा एकदा चर्चेत आली होती. आर्याने निक्कीला रॅपमधून जबरदस्त उत्तर दिले होते. निक्कीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोमध्ये आपले पाककौशल्य सर्वांना दाखवताना दिसत आहे. तसेच प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. आता निक्की या शोमध्ये तरी बाजी मारणार का हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.