(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दिल्लीतील लवकुश रामलीला मैदानात २ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य दसऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. या वर्षी ‘बाबा निराला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉबी देओल रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो या कार्यक्रमात रावणाचा वध करणार आहे, ज्यामुळे या महोत्सवाची शोभा वाढेल आणि प्रेक्षकांच्या उत्साहात वाढ होईल.
लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी सांगितले की, दसऱ्याला रावणाचा वध करण्यासाठी जेव्हा बॉबी देओलला आमंत्रित करण्यात आले तेव्हा त्यांनी उत्साहाने आमंत्रण स्वीकारले. या ऐतिहासिक रंगमंचावर बॉबी देओलची उपस्थिती रामलीला आणखी भव्य आणि संस्मरणीय बनवेल असा समितीचा विश्वास आहे.
दिल्लीतील प्रसिद्ध लव कुश रामलीला या वर्षी चर्चेत आहे. बोल्ड अभिनेत्री पूनम पांडेचे नाव या कार्यक्रमाशी जोडलं गेलं होतं. पूनम यात रावणाची बायको मंदोदरीची भूमिका साकारणार होती. पण संत आणि ऋषींनी विरोध करण्यास सुरुवात केली. या वादानंतर तिचं नाव रामलीलेतून काढून टाकण्यात आलं आहे.
‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
बॉबी देओल सध्या आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूडमुळे चर्चेत आहे. यामध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळतोय. अशातच तो आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, त्याचं कारण म्हणजे दिल्लीतील लाल किल्ल्यावरील रामलीला या प्रसिद्ध कार्यक्रमामुळे. या कार्यक्रमासाठी बॉबी देओलला आमंत्रण मिळालं आहे, तो यंदा दसऱ्याच्या दिवशी त्या कार्यक्रमात रावन दहन करणार आहे.
दिल्लीच्या लाल किल्ल्यातील लवकुश रामलीला ही देशातील सर्वात प्रतिष्ठित रामलीलांपैकी एक आहे. येथे पौराणिक कथा आणि आधुनिक नाट्याचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते, ज्यासाठी दिल्ली तसेच इतर भागांतून प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात. या वर्षी बॉबी देओल मुख्य पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
बॉबी देओल अलीकडे संदीप रेड्डी वांगच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानंतर आता तो शाहरुख खानच्या मुलाच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजमधून झळकत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलने आर्यन खानच्या कामाचं मनापासून कौतुक केलं.