'Tira' ने Jio World Plaza मध्ये लक्झरी ब्युटी स्टोअर केले लाँच फोटो (सौजन्य - RNO Feed)
या कार्यक्रमात करीना कपूर खान ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली. यावेळी तिने वेव्ही स्टाइलमध्ये केस मोकळे ठेवले होते. तिच्या गळ्यातला हलका चोकर तिच्या सौंदर्यात भर घालत होता. करिनाच्या या लूकवरून लोकांना नजर हटवता आली नाही.
या कार्यक्रमात किंग खानची लाडकी म्हणजेच सुहाना खान निळ्या रंगाच्या कॉर्टसेट मध्ये दिसली. या आउटफिटमध्ये तिची स्टाइल खूपच क्लासी दिसत होती. हा रंग सुहानावर खुलून दिसत होता. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी सुहानाने गळ्यात चोकर घातला आणि हातात बॅग घेतली होती.
लाल परीच्या वेशभूषेत कार्यक्रमाला आलेल्या कियारा अडवाणीपासून लोकांना नजर हटवता आलीच नाही. डीप नेक आणि फुल स्लीव्हज ड्रेसयामध्ये अभिनेत्री खूप आकर्षित दिसत होती. या लुकसोबत तिने चमकदार लाल लिपस्टिकही लावली होती.
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी हिचा रेड हॉट लूक पाहण्यासारखा होता. लेदर सिल्क फॅब्रिकपासून बनवलेला बॉडीकॉन ड्रेस परिधान करून तृप्तीने कार्यक्रमात तिची ग्लॅमरस शैली दाखवली. या लूकसोबत तिने हाय हिल्स घातल्या होत्या.
सोनाली बेंद्रे काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कार्यक्रमात पोहोचली. या पोशाखात तिने तिचे केस बनमध्ये बांधले होते आणि कानात सोनेरी हूप्स घातले होते, ज्यामुळे तिचा लूक आणखी सुंदर दिसत होता.
अभिनेत्री शालिनी पासी देखील स्वतःचा लुक घेऊन कार्यक्रमात पोहोचली. यावेळी तिने ऑफ व्हाईट रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. या आउटफिटमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.
नीता अंबानी देखील जिओ वर्ल्ड सेंटर येथे रिलायन्स रिटेलच्या टिरा ब्युटी फ्लॅगशिप स्टोअरच्या लाँचच्या वेळी त्या मुलगी ईशा अंबानीसह सहभागी झाल्या होत्या. जिथे त्याचा स्टायलिश लुक पाहायला मिळाला.