'देवरा' रिलीज होताच चाहत्यांनी साजरी केली दिवाळी, चित्रपटगृहांबाहेर दिसले हे दृश्य! (फोटो सौजन्य- Xअकाउंट)
ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर सैफ अली खान या तिघांचा ‘देवरा’ चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चाहते खूप प्रेम आणि प्रतिसाद देताना दिसत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कोरटाळा सिवा दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहांबाहेर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. एकीकडे चित्रपटगृहांच्या बाहेर ज्युनियर एनटीआरचे कटआऊट लावण्यात आले होते, तर दुसरीकडे दिवाळीपूर्वी लोक फटाके फोडतात तसेच उत्साह साजरा करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘देवरा’चे सकाळचे शोही हाऊसफुल्ल झाले आहेत.
‘देवरा’ प्रदर्शित होताच चित्रपटगृहाबाहेर फुटले फटाके
ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओंमध्ये ज्युनियर एनटीआरचे चाहते सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. ‘देवरा’ रिलीज झाल्यानंतर काही लोक फटाके फोडत आहेत, तर काही आनंदात नाचताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळत आहे. एक्स हँडलवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओंमध्ये असे दिसून येते की चाहते त्यांच्या हातात जूनियर एनटीआरचे कटआउट्स घेऊन खूप नाचत आहेत. हा चित्रपट चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसत आहे. या चित्रपटाची पहिल्याच दिवशी चांगली कमाई झाली असून, हा चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरणार यात शंकाच नाही.
Orey idem mass idem Racha ra …. cutout ni Racha chesaru 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 pic.twitter.com/swFZPGSjcg
— BANGALORE NTR FAN CLUB (@BnglrNTRfanclub) September 26, 2024
Tadipatri NTR @tarak9999 anna
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏sorry for low qty video
will post core rurals areas celebrations later pic.twitter.com/ejAudZ7Kxi
— మట్టి తుఫాన్ (@KadapaKing9999) September 26, 2024
हे देखील वाचा- Bhool Bhulaiyaa 3 Teaser : रुह बाबाला हरवायला सज्ज झाली ‘मंजुलिका’, दिवाळीला होणार ‘भूल भुलैया 3’चा धमाका!
काय आहे ‘देवरा’ चित्रपटाची कहाणी
काय आहे ‘देवरा’ चित्रपटाची कहाणी
कोरटाळा शिवा दिग्दर्शित ‘देवरा’ या चित्रपटात समुद्री कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर ‘देवरा’ची भूमिका साकारत आहे. तसेच बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्यात जबरदस्त रोमान्स पाहायला मिळत आहे. हा चित्रपट एक थिल्लर ॲक्शन चित्रपट आहे. चाहत्यांचा हा उत्साह पाहून चित्रपटाच्या कहाणी धमाकेदारच असणार या गोष्टीचा अंदाज आला आहे.