देवों के देव महादेव मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली सोनारिका भदोरियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीने बेबी बम्प फ्लॉन्ट करत फोटोशूट केले आहे. सोनारिका आणि विकास या जोडप्याने त्यांच्या बेबीमूनच्या छायाचित्रांसह सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली, ज्यामध्ये सोनारिका तिच्या बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. त्यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनी त्यांनी ही आनंदाची बातमी दिली.