(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खान याने इंडस्ट्रीमध्ये अनेकांचे करिअर बनवले आहे. सलमान खान एखाद्याच्या कौशल्याचे कौतुक करण्यास कधीच मागे हटत नाही. सलमान खानने नुकतंच त्याच्या एक्स अकाऊंटवर एका 15 वर्षाच्या तरूण गायकाचा फोटो पोस्ट केला आहे. या 15 वर्षाच्या मुलाचे नाव जोनास कॉनर असं आहे. जो भावनिकदृष्ट्या गाणी लिहिण्यासाठी आणि त्याच्या उत्कृष्ट गायनासाठी ओळखला जातो..
‘अमिताभ यांना खुश करायला रेखांनी चक्क…’ अनेक वर्षांनी आलं समोर
सलमान खानने या 15 वर्षाच्या मुलासाठी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. सलमान खान हेही म्हणाला आहे की ”त्याला जोनास याची गाणी ऐवढी आवडली आहेत की तो पुन्हा पुन्हा त्याची गाणी ऐकत असतो. या पोस्टमध्ये सलमानने जोनास याची तीन गाणी सांगितली आहेत जी तो सतत ऐकत असतो.”
सलमान खानने या मुलाचे कौतुक करताना लिहिले- मी कधीही १५ वर्षांच्या मुलाला त्याच्या वेदना इतक्या सुंदरपणे व्यक्त करताना पाहिले नाही. देव तुम्हाला आशीर्वाद देवो, तो म्हणाला जर आपण अशा मुलांना पाठिंबा देत नाही तर आपण काय केले? अशी अनेक लोक आहेत त्यांना प्रेरणा द्या त्यांचे शोषण करू नका. या पोस्टमुळे सलमान खानने सगळ्या चाहत्यांचे मन जिंकले आहे.
Never have I seen a 15 year old turn his pain into something so beautiful ..
God bless you #JonasConner
Listening on repeat
Father in a bible
Peace with pain
Oh AppalachiaAisey bacchon ko Na support kiya toh phir kya kiya
Bhaiyon aur behno ye English mein hai ..
yahan… pic.twitter.com/L0tIdQBZfJ— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 13, 2025
जोनास कॉनर कोण आहे?
टेनेसीच्या चट्टानूगा बाहेरील एका लहान शहरात जन्मलेला आणि वाढलेला 15 वर्षीय जोनास कॉनर नेहमीच संगीत आणि कथाकथनाकडे आकर्षित झाला आहे. याच्या १३ व्या वर्षी, त्याने त्याची गाणी ऑनलाइन शेअर करण्यास सुरुवात केली, त्याच्या लहान शहरातील हृदयस्पर्शी आणि मूळ गाण्यांनी प्रेक्षकांना मोहित केले.
मोठं यश
ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याने त्याचं पहिले स्वतंत्र सिंगल “Father in a Bible” रिलीज केलं. हे गाणं त्याच्या वडिलांशिवाय मोठं होण्याच्या अनुभवावर आधारित आहे, आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटल्या.गाणं रिलीज झाल्यानंतर पहिल्या ३० दिवसांत २ कोटी वेळा ऐकलं गेलं.यामुळे जोनासला “चांगला नवीन गायक” म्हणून ओळख मिळाली आणि त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली.