Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhamaal 4: कॉमेडीची ‘धमाल’ पुन्हा अनुभवायला मिळणार, चित्रपटाबाबत जावेद जाफरींनी दिले उपडेट!

जर आपण बॉलीवूडच्या सर्वात चमकदार कॉमेडी फ्रँचायझीबद्दल बोललो तर 'धमाल' चित्रपटाचे नाव नक्कीच घेतले जाईल. आतापर्यंत धमालने तीन भागांतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 14, 2024 | 10:34 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

सध्याच्या काळात जुन्या चित्रपटांचे सिक्वेल किंवा त्यांचा तिसरा-चौथा भाग बनवण्यासाठी चित्रपट निर्मात्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधीच, शाहरुख खानच्या 90 च्या दशकातील बाजीगर या कल्ट चित्रपटाच्या सीक्वलबद्दल चित्रपट निर्मात्याकडून पुष्टी आली आणि आता हिंदी चित्रपटातील सर्वात यशस्वी कॉमेडी फ्रँचायझी धमाल 4 बद्दल नवीनतम अपडेट आले आहे. ज्याला धमाल मधील मानव म्हणजेच अभिनेता जावेद जाफरीने आनंदाची बातमी दिली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगबाबत त्यांनी चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. अभिनेता जावेद काय म्हणाला जाणून घेऊयात.

हे देखील वाचा- Kanguva Early Review: ‘कांगुवा’ रिलीज होण्यापूर्वीच ‘कल्ट क्लासिक’ घोषित, सुर्या-बॉबी देओलने जिंकले मन!

धमाल 4 चे शूटिंग होणार लवकरच सुरु
धमाल बॉलीवूडच्या त्या प्रसिद्ध कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक आहे, ज्यांचे पात्र कल्ट आहेत आणि प्रेक्षक आजही ते पाहताना एन्जॉय करतात. अशा परिस्थितीत, या चित्रपटाचा चौथा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. अलीकडेच अभिनेता जावेद जाफरी याने एएनआय या वृत्तसंस्थेला एक ताजी मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याला धमाल 4 बद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर अभिनेता जावेद म्हणाला की, ”धमाल 4 नक्कीच येईल, आम्ही सर्वजण त्याच्या तयारीत व्यस्त आहोत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला त्याचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. जग खूप वेगाने बदलत आहे, त्यानुसार सिनेमाही बदलत आहे. 60 आणि 70 च्या दशकात चित्रपटांमध्ये वेगळ्या प्रकारची कॉमेडी पाहायला मिळत होती, जी आता पूर्णपणे बदलली आहे. आशा आहे की धमाल 4 मध्ये तुम्हाला अशाच उत्तम प्रकारचे कॉमेडी पाहायला मिळेल.” असे अभिनेत्याने सांगितले.

अशाप्रकारे जावेद जाफरी यांनी धमाल 4 च्या शूटिंगबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. धमाल 2026 साली सिल्व्हर स्क्रीनवर रिलीज होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच ही बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट अद्यापही समोर आले नाही आहे.

हे देखील वाचा- Bigg Boss 18 : करणवीर मेहराला मैत्रीत धोका! पहिल्यांदाच झाला भावुक, अश्रू झाले अनावर

अजय देवगण धमाल ४ चा भाग असणार?
दिग्दर्शक इंदर कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली 2007 मध्ये धमाल पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. यानंतर 2011 मध्ये धमालचा सिक्वेल आला आणि त्याने चाहत्यांना खूप हसवले. यानंतर 2019 मध्ये धमालचा तिसरा भाग आला. त्याने देखील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. ज्यामध्ये अजय देवगण, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांसारख्या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारली होती. या परिस्थिती अशी होती की टोटल धमालही सुपरहिट झाला होता. अजय देवगण धमाल फ्रँचायझीशी जोडला जाणार असून तो भाग 4 मध्येही दिसणार असल्याची बातमी अलीकडेच समोर आली आहे.

Web Title: Dhamaal 4 comedy movie shooting start from next years confirmed by jaaved jaaferi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 10:34 AM

Topics:  

  • Ajay Devgn
  • best comedy movies

संबंधित बातम्या

Nana Patekar Passes Away: रांगडा आवाज अन् दमदार अभिनय! नाना पाटेकरांनी ‘या’ सुपरहिट डायलॉगने चाहत्यांच्या मनावर घातली होती भुरळ
1

Nana Patekar Passes Away: रांगडा आवाज अन् दमदार अभिनय! नाना पाटेकरांनी ‘या’ सुपरहिट डायलॉगने चाहत्यांच्या मनावर घातली होती भुरळ

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला
2

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला

Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय; सस्पेन्स दमदार पण नवीन काहीच नाही?
3

Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय; सस्पेन्स दमदार पण नवीन काहीच नाही?

Drishyam 3: रिलीजआधीच ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी झेप; पहिल्याच दिवशी विक्रम मोडणार?
4

Drishyam 3: रिलीजआधीच ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी झेप; पहिल्याच दिवशी विक्रम मोडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.