(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘इडली कडाई’मुळे चर्चेत आहे. त्याचा ‘इडली कडाई’ हा चित्रपटही प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. हा चित्रपट 1 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने स्व:त केले असून तो त्यात मुख्य भूमिकेतही आहे. 14 सप्टेंबरला चेन्नईमध्ये आयोजित ऑडिओ लॉंच कार्यक्रमात, धनुषने आपल्या बालपणाची एक आठवण शेअर केली आहे.
तो म्हणाला, “मी लहानपणी इडली खरेदी करण्यासाठी सकाळी 4 वाजता उठून फुले गोळा करून ती विकायचो, “आज इंटरनेटवर काही लोकांना माझी ही गोष्ट खरी वाटत नाही; त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही”धनुषने सांगितलेल्या या गोष्टी ऐकून कार्यक्रमात उपस्थित असलेले चाहते आणि मीडिया प्रतिनिधी भावूक झाले होते. सोशल मीडियावर त्याच्या या प्रामाणिकपणाची आणि साधेपणाची चर्चा पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशी झाली मावशी, स्पृहाने केली गोड पोस्ट..
तो पुढे म्हणाला की, त्यावेळी इडली खाल्ल्याने त्याला मिळणारा आनंद आताच्या तुलनेत काहीच नाही, “आम्हाला कामासाठी प्रत्येकी २ रुपयांपेक्षा थोडे जास्त पैसे मिळायचे. स्वतःच्या कष्टाच्या पैशातून जेवण खाल्ल्याने मिळणारे समाधान आणि आनंद मला आता रेस्टॉरंटमध्ये मिळत नाही, जो मला माझ्या बालपणी मिळत होता.”
सिनेसृष्टीतून निवृत्त होणार नाना पाटेकर? घेतला मोठा निर्णय, म्हणाले ‘मला माझ्या पद्धतीने जगायचंय…’
इंटरनेटवर प्रतिक्रिया
लोकांनी प्रश्न उपस्थित केला की ”दिग्दर्शक कस्तुरी राजाचा मुलगा धनुषला खरोखरच इडली खरेदी करण्यासाठी संघर्ष करावा लागला का”. “धनुष हा दिग्दर्शकाचा मुलगा आहे. त्याच्याकडे पैसे नव्हते. अश्या प्रतिक्रिया इंटरनेटवर बघायला मिळत आहेत.
या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
1 ऑक्टोबर रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे . ‘पा पांडी’, ‘रायन’ आणि ‘निलावुक्कू एन मेल एन्नाडी कोबम’ नंतर ‘इडली कडाई’ हा धनुषचा चौथा दिग्दर्शकीय उपक्रम आहे. ‘इडली कडाई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबतच तो या चित्रपटात महत्त्वाची भूमिकाही साकारत आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहते देखील उत्सुक आहेत.
चित्रपटातील कलाकार आणि कथा
हा चित्रपट ग्रामीण भागावर आधारित एक भावनिक नाट्य आहे, जो ‘तिरुचिराम्बलम’ नंतर धनुष आणि नित्या मेनन हे दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ‘इडली कडाई’मध्ये धनुष, नित्या मेनन, अरुण विजय, शालिनी पांडे, प्रकाश राज आणि राजकिरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.