(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असते. ती नेहमी तिच्या आयुष्यातील खास क्षण आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. स्पृहा जोशी आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि स्वरचित कवितांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीने नुकतीच एक गोड पोस्ट केली आहे. यात तिने ती मावशी झाल्याचे सांगितले आहे. या पोस्टमध्ये तिने तिची बहिण क्षिप्रा जोशी हीच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट केली आहे. यात तिने तिच्या चिमुकल्या भाच्याचीही झलक दाखवली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.
“मिराई सिनेमा बघितल्यावर मी स्वतःच्या थोबाडीत मारली!” असं का म्हणाले राम गोपाल वर्मा?
स्पृहानं ही पोस्ट शेअर करत कुटुंबियांसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. भाचा कबीरच्या बारश्याचे हे फोटो आहेत. या सर्व फोटोंमध्ये स्पृहा आणि तिचं संपूर्ण कुटुंब पारंपरिक मराठमोळ्या अंदाजत पाहायला मिळत आहेत.
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधली कुहू, ‘उंच माझा झोका’मधली रमाबाई आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’मधली ईशा या तिन्ही व्यक्तिरेखांमुळं स्पृहा घराघरात पोहोचली आहे .स्पृहा आणि क्षिप्रा यांच्यातल्या खास बॉन्डिंगची नेहमीच चर्चा होत असते. स्पृहा नेहमीच तिच्या बहिणीबद्दल भरभरून बोलताना दिसते तर दोघी बहिणींच्या चेहऱ्यांमध्ये साम्य असल्यानं चाहत्यांचा अनेकदा गोंधळ होतो.
सिनेसृष्टीतून निवृत्त होणार नाना पाटेकर? घेतला मोठा निर्णय, म्हणाले ‘मला माझ्या पद्धतीने जगायचंय…’
काय आहे स्पृहा जोशीची पोस्ट?
हॅप्पी बर्थडे माझी चिमुकली मुलगी. यावर्षीचा तुझा वाढदिवस एक्स्ट्रा एक्स्ट्रा स्पेशल आहे. आणि हे कबीर नावाचं रिटर्न गिफ्ट तू आम्हाला यावर्षी आधीच देऊन टाकलंस. त्यासाठी थँक यू I love you the most.. पण आता त्यात जरा मोठा वाटेकरी आलाय. खूप प्रेम…