(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
संपूर्ण देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. देशभरात सध्या प्रत्येकजण दिवाळीची जोरदार तयारी करण्यात व्यस्त आहे. फटाके, दिवे, रंगीत सजावट, नवीन कपडे यांसह सणाची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, या आनंदाच्या वातावरणातही अभिनेता दिलजीत दोसांझने दिवाळी साजरी न करण्याचं कारण सांगितले आहे. दिलजीत दोसांझच्या फॅन पेज ‘टीम दिलजीत ग्लोबल’वर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिलजीतने सांगितले की, ”पूर्वी दिवाळी त्यांचा सर्वात आवडता सण होता. लहानपणी तो हा सण खूप धमाल, उत्साह आणि मोठ्या उत्सवात साजरा करत असत.”
”दिवाळीची तयारी ते जवळपास एक महिना आधीपासूनच सुरू करायचे. त्यांच्या गावात, घरात आणि शेजारच्या गल्लींमध्ये दिवे लावले जात आणि संध्याकाळी फटाके फोडले जायचे. घर सुंदरपणे सजवले जायचे आणि संपूर्ण वातावरण एक वेगळ्या उर्जेने भरलेले असायचे.” दिलजीत दोसांझने स्पष्ट केले की, ”त्याच्या गावातील दोसांझ कला येथील गुरुद्वारा, शिव मंदिर, दर्गा आणि गुगा पीर मंदिरात जाऊन दिवे लावायचे.हे उत्सव रात्री उशिरापर्यंत चालू असायचे. जर त्याच्याकडचे फटाके संपले, तर तो इतरांकडून उधार घेऊन ते फोडायचा. पण जेव्हा तो त्याच्या कुटुंबापासून वेगळा झाला तेव्हा दिवाळीचा आनंद आणि चमक नाहीशी झाली. दिलजीत म्हणाला की, आता त्याला फटाक्यांच्या आवाजाचीही भीती वाटते.”
“जयाने पांढरी साडी नेसली, तर तू..”, अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी आई तेजी बच्चन यांनी दिली होती धमकी
२०२४ मध्ये दिलजीत दोसांझने एका मुलाखतीत त्याच्या पालकांशी असलेल्या तुटलेल्या नात्याबाबत मनमोकळेपणाने बोलला. त्याने सांगितलं की, लहानपणी त्यांच्या पालकांनी त्याला चांगले शिक्षण आणि जेवण मिळावं म्हणून त्याला एका नातेवाइकाकडे लुधियानाला पाठवले होते.त्याच्या मते, त्याच्या पालकांनी त्याला याबद्दल विचारलेही नाही आणि त्यामुळेच त्यांचे नाते तुटले.
आई झाल्यानंतर Deepika Padukoneने केला मोठा बदल, इन्स्टाग्रामवर दिसली खास झलक, फोटो होत आहेत व्हायरल!