(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जगातील सर्वात मोठा फॅशन शो किंवा फॅशन फेस्टिव्हल, मेट गाला, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही ६ मे रोजी न्यू यॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये मेट गालाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान, कियारा अडवाणी, प्रियंका चोप्रा आणि दिलजीत दोसांझ या स्टार्सनी कार्पेटवर आपली झलक संपूर्ण जगाला दाखवून दिली. शाहरुखने त्याच्या स्टारडमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर कियाराचा क्युट बेबी बंपसहचा लुक प्रेक्षकांना खूप आवडला आणि दिलजीतच्या महाराजा लुकने लोकांची मने जिंकली. तसेच आता या Met Gala २०२५ मध्ये कोणत्या भारतीय कलाकाराने सर्वोत्तम ड्रेसचा किताब जिंकला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
यावेळी मेट गालामध्ये शाहरुख खान आणि दिलजीत दोसांझच्या ड्रेसची खूप प्रशंसा झाली. हा कार्यक्रम दिलजीत दोसांझसाठी संस्मरणीय ठरला आहे कारण त्याच्या ड्रेसला नंबर वन रेटिंग देण्यात आले आहे. दिलजीतने भारतासह अनेक हॉलिवूड स्टार्सना मागे टाकले आहे. तसेच दिलजीत दोसांझच्या ड्रेसची जगभरात सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचा देखणा लुक नेहमीच चाहत्यांच्या लक्षात राहणार आहे. तसेच याचकारणामुळे दिलजीत दोसांझला मेट गाला २०२५ चा सर्वोत्तम ड्रेसचा किताब मिळाला आहे.
दिलजीतचा ड्रेस पहिल्या क्रमांकावर होता
वोग मासिकाच्या मते, दिलजीत दोसांझचा ड्रेस ३०६ लोकांमध्ये प्रथम क्रमांकावर होता. वोगने आपल्या वाचकांना सर्वोत्तम ड्रेस निवडण्याची जबाबदारी दिली. व्होगच्या वाचकांनी पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा ड्रेस सर्वोत्तम ड्रेस म्हणून निवडला आहे. आणि आता ही बातमी ऐकून भारतीय लोकांना चांगलाच आनंद झाला आहे. दिलजीतला देखील स्वतःचा अभिमान वाटत आहे.
शाहरुख आणि कियारा यांना यादीत स्थान नाही
दिलजीतनंतर, एस कूप्स, झेंडाया, ट्रेयाना टेलर, रिहाना, निकी निनाझ, शकीरा आणि लुईस या कलाकारांची नावे व्होगने जाहीर केलेल्या यादीत आली. भारताकडून शाहरुख खान आणि कियारा अडवाणी यांनी मेट गालामध्ये सहभाग घेतला. तथापि, दोघांचेही कपडे सर्वोत्तम पोशाखांच्या यादीत समाविष्ट नव्हते. कियारा अडवाणी, शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा, तिघेही या यादीत स्थान मिळवू शकले नाहीत.
दिलजीतचा ड्रेस कसा होता?
यावेळी मेट गालामध्ये गायक-अभिनेता दिलजीत दोसांझने शानदार पदार्पण केले. आपल्या फॅशनने अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दिलजीतने मेट गालामध्ये आपल्या महाराजा लुकने सर्वांचे मन जिंकले. दिलजीतने प्रबल गुरुंग यांनी डिझाइन केलेला पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. पंजाबी राजेशाहीची झलक दाखवत, दिलजीतच्या पोशाखात कुर्ता आणि लांब अंगरखा होता आणि पगडी परिधान केली होती. दिलजीतने जड ॲक्सेसरीज, दागिने आणि तलवारीने त्याचा महाराजा लुक पूर्ण केला. दिलजीतला पाहून त्याच्या चाहत्यांनी ‘ओये पंजाबी आला ओये’ असे म्हटले. सोशल मीडियावर त्याच्या लुकचे खूप कौतुक झाले.