Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

सिद्धार्थ चांदेकर आणि मुक्ता बर्वे या दोघांचा नुकताच आगामी चित्रपट 'माया' प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अशातच आता प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री आवडत असल्याचे दिसून येत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 17, 2026 | 08:31 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध
  • सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वेची केमिस्ट्री चर्चेत
  • ‘माया’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
नातेसंबंधांवर भाष्य करणारे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भिडतात, कारण ते केवळ पडद्यावरची कथा नसतात तर त्या आपल्या आयुष्याचाच एक आरसा असतात. व्यक्त न झालेल्या भावना, मनात साचलेली खंत, न सांगितलेले प्रश्न आणि नात्यांमधील गुंतागुंत यांना शब्द देणारा ‘माया’ हा चित्रपट आता आपल्या ट्रेलरसह प्रेक्षकांसमोर आला आहे आणि भावनिक चर्चेला नवी दिशा देताना दिसत आहे.

‘माया’चा ट्रेलर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करणारा आहे. माणूस खरोखरच एकटेपणाला घाबरतो की पोरकेपणाच्या भावनेला? हे या चित्रपटाच्या कथेतून उलगडणार आहे. आयुष्यातील नाती जपताना नकळत निर्माण होणारे गैरसमज, मनात साचत जाणाऱ्या अढी, न बोललेले शब्द आणि त्या सर्वांमुळे वाढत जाणारे अंतर यांचा संवेदनशील प्रवास ट्रेलरमध्ये प्रभावीपणे उलगडतो. हा ट्रेलर केवळ कथा दाखवत नाही, तर भावनिक मुक्ततेची आणि समजूतदार संवादाची गरज अधोरेखित करतो.

Don 3 Movie: रणवीर सिंग नंतर फरहान अख्तर स्वतः साकारणार‘डॉन’ची भूमिका? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर यांनी साकारलेली ‘हाऊस फादर’ची भूमिका कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. मुलीत रमलेला, कुटुंबासाठी जगणारा पण स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करणारा हा व्यक्तीरेखा प्रेक्षकांना अंतर्मुख करते. त्याच्या नजरेतून आणि शांततेतून व्यक्त होणारा भावविश्व मनाच्या खोल कप्प्यात डोकावायला भाग पाडतो. मुक्ता बर्वे यांची व्यक्तिरेखा आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या तिच्या प्रवासात अनेक भावनिक थर उलगडताना दिसतात. तिच्या अभिनयातून स्त्रीमनातील द्वंद्व, स्वाभिमान आणि भावनिक संघर्ष प्रभावीपणे समोर येतो.

 

अनुभवसंपन्न कलाकार विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांची उपस्थिती कथेला स्थैर्य आणि वास्तवाची छटा देते. त्यांच्या व्यक्तिरेखा आयुष्यातील परिपक्वता आणि अनुभवाचे वजन जाणवून देतात. तर गिरीश ओक यांच्या भूमिकेमुळे कथानकाला एक वेगळे गूढ परिमाण लाभते. त्यांच्या व्यक्तिरेखेतील अंतर्गत संघर्ष, न सांगितलेले आघात आणि स्वतःभोवती उभारलेली भावनिक भिंत ट्रेलरमध्ये प्रकर्षाने जाणवते.

kohrra 2 ’मध्ये स्त्रीशक्तीचा ठसा, पूजा भामर्रांची दमदार भूमिका चर्चेत, आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली…

विशेष म्हणजे, ट्रेलरमध्ये संवादांपेक्षा शांतता अधिक बोलकी ठरते. ट्रेलरचा शेवट आशेचा किरण दाखवतो, पण त्याचवेळी अनेक अनुत्तरित प्रश्नही सोडून जातो, ज्यांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहेत. दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी या चित्रपटातून प्रत्येकाच्या मनात दडलेल्या, व्यक्त न झालेल्या भावनांना पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, काही नाती आपण जपतो, तर काही नकळत तुटतात; मात्र प्रत्येक नातं आपल्याला काहीतरी शिकवून जातं. भूतकाळाच्या सावल्या कितीही गडद असल्या तरी संवाद आणि मायेच्या स्पर्शातून नव्या प्रवासाची सुरुवात करता येते. हा आशावादी संदेश ‘माया’ चित्रपटातून मिळणार आहे.

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या निर्मितीत साकारलेला हा चित्रपट निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य यांच्या पाठबळाने साकारला आहे. भावनांच्या सूक्ष्म छटा टिपणारा, नात्यांचा अर्थ नव्याने सांगणारा ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना स्वतःचं प्रतिबिंब मोठ्या पडद्यावर पाहण्याची एक हृदयस्पर्शी संधी देणार आहे.

Web Title: Maya trailer mukta barve siddharth chandekar girish oak marathi film watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Adani Airports आणि IHG हॉटेल्सचा ऐतिहासिक करार; देशातील 5 प्रमुख विमानतळांवर उभारणार 1500 हून अधिक रूम्स
1

Adani Airports आणि IHG हॉटेल्सचा ऐतिहासिक करार; देशातील 5 प्रमुख विमानतळांवर उभारणार 1500 हून अधिक रूम्स

Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक
2

Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक

TVS Motor Profit : टीव्हीएस मोटारची घोडदौड कायम; स्कूटर, EV आणि तीनचाकी विक्रीत मोठी वाढ
3

TVS Motor Profit : टीव्हीएस मोटारची घोडदौड कायम; स्कूटर, EV आणि तीनचाकी विक्रीत मोठी वाढ

दिग्गज कंपन्यांनी उचललं मोठं पाऊल, WFH आणि परदेशी यात्रांबाबत PM मोदी यांच्या आवाहनानंतर घेतला निर्णय
4

दिग्गज कंपन्यांनी उचललं मोठं पाऊल, WFH आणि परदेशी यात्रांबाबत PM मोदी यांच्या आवाहनानंतर घेतला निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.