फोटो सौजन्य - Instagram
‘सैयारा’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बाजारात २७३.५० कोटींची कमाई केली आहे. अहान पांडे आणि अनित पड्डा अभिनीत या चित्रपटाने थिएटरमध्ये रोमान्स आणला आहे. आता, चित्रपटाच्या यशाबद्दल एएनआयशी बोलताना दिग्दर्शक मोहित सुरी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते चित्रपटाच्या यशाबद्दल नक्की काय म्हणाले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
‘सैयारा’च्या यशाबद्दल मोहित सुरीची प्रतिक्रिया
चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांनी या चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की त्यांचे फक्त एकच ध्येय होते एक चांगला चित्रपट बनवणे आणि प्रेक्षकांना आनंदी करणे. मोहित म्हणाले की, त्यांना कधीच इतक्या मोठ्या यशाची अपेक्षा नव्हती. त्याच वेळी, या चित्रपटाचे प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनीही यावर भाष्य केले.
#WATCH | Mumbai | On the success of the movie ‘Saiyaara’, Yash Raj Films CEO, Akshaye Widhani says, “We decided to make a love story and Yash Raj Films (YRF) has always been known for its love stories…The movie was first discussed in a temple, so we are blessed…In the first… pic.twitter.com/2UahE9WFpr — ANI (@ANI) July 30, 2025
‘सैयारा’ चित्रपटाची पहिली चर्चा एका मंदिरात झाली
‘सैयारा’ चित्रपटाबद्दल एक मनोरंजक गोष्टही समोर आली. यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी सांगितले की, प्रोडक्शन हाऊसने पहिल्यांदा मोहित सुरी यांच्याशी या चित्रपटाबद्दल मंदिरात चर्चा केली. अक्षय विधानी यांनी सांगितले की, हा चित्रपट बनवण्याची कल्पना मंदिरात झालेल्या चर्चेदरम्यान आली होती, म्हणून ते हे त्यांचे नशीब मानतात. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा पटकथा वाचली तेव्हा त्यांना लगेच समजले की हा चित्रपट बनवावाच लागेल.
‘ठरलं तर मग’ मालिका महत्वाच्या वळणावर! प्रिया ठरली दोषी, मालिकेत येणार सात वर्षांचे लीप?
बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची जबरदस्त कामगिरी
१८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी २१.५ कोटी रुपये कमावले. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १७२.७५ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८ कोटी रुपये कमावले. शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने अनुक्रमे २६.५ आणि ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सोमवार आणि मंगळवारी चित्रपटाने ९.२५ आणि १० कोटी रुपये कमावले. बुधवारी चित्रपटाने ७ कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे, चित्रपटाने आतापर्यंत २७३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.