
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट धुमाकूळ घालत आहेत. अश्यातच हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा “एक दीवाने की दिवानियत” आणि आयुष्मान खुराणा आणि रश्मिका मंदाना यांचा “थामा” हा चित्रपट तिकीट खिडकीवर आपली जादू दाखवत आहे. दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊन १२ दिवस झाले आहेत. दरम्यान, त्यांचे १२ व्या दिवसाचे कलेक्शन देखील समोर आले आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाची आतापर्यंतची कमाई?
“एक दीवाने की दिवानियत” चित्रपटाचे कलेक्शन
Sacnilk.com नुसार, हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या “एक दीवाने की दिवानियत” ने रिलीजच्या १२ व्या दिवशी ३.१५ कोटी रुपये कमावले आहे. दरम्यान, आयुष्मान खुराणा आणि रश्मिका मंदाना यांच्या “थामा” ने १२ व्या दिवशी ४.६५ कोटी रुपये कमावले आहे. दोन्ही चित्रपटांच्या कमाईत थोडीशी वाढ झालेली दिसून आली आहे. परंतु, हे आकडे प्राथमिक आणि अंदाजे आहेत आणि यामध्ये बद्दल होण्याची शक्यता आहे.
दोन्ही चित्रपटांचे एकूण कलेक्शन
या दोन्ही चित्रपटांच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, “एक दीवाने की दिवानियत” ने ₹६०.६५ कोटी (US$१.२ दशलक्ष) कमावले आहेत. तर, “थामा” ने ₹११६.०५ कोटी (US$१.२ दशलक्ष) कमावले आहेत. दोन्ही चित्रपट चांगली कमाई करत आहेत. त्यांची कमाई कुठे संपेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच चित्रपट पुढे किती कमाई करतो हे पाहणे बाकी आहे.
गेल्या ११ दिवसांतील कमाई
शिवाय, जर आपण गेल्या ११ दिवसांतील या चित्रपटांच्या कमाईवर नजर टाकली तर, ‘एक दिवाने की दिवानियत’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ₹९ कोटी, दुसऱ्या दिवशी ₹७.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ₹६ कोटी, चौथ्या दिवशी ₹५.५ कोटी, पाचव्या दिवशी ₹६.२५ कोटी, सहाव्या दिवशी ₹७ कोटी, सातव्या दिवशी ₹३.५ कोटी आणि आठव्या दिवशी ₹४.५ कोटी कमावले.
SRK Birthday Special: शाहरुख खान कधीच का हरत नाही? अभिनेत्याने कसे आहेत इतके पैसे आणि टॅलेंट ?
‘थामा’ चित्रपटाचे कलेक्शन
शिवाय, चित्रपटाने नवव्या दिवशी ₹३ कोटी, दहाव्या दिवशी ₹२.६५ कोटी आणि अकराव्या दिवशी ₹२.३५ कोटी कमावले आहे. दरम्यान, “थामा” चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹२४ कोटी, दुसऱ्या दिवशी ₹१८.६ कोटी, तिसऱ्या दिवशी ₹१३ कोटी, चौथ्या दिवशी ₹१० कोटी, पाचव्या दिवशी ₹१३.१ कोटी, सहाव्या दिवशी ₹१२.६ कोटी, सातव्या दिवशी ₹४.३ कोटी आणि आठव्या दिवशी ₹५.७५ कोटी कमावले. शिवाय, चित्रपटाने नवव्या दिवशी ₹३.६५ कोटी, दहाव्या दिवशी ₹३.४ कोटी आणि अकराव्या दिवशी ₹३ कोटी कमावले आहे.