(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आज २ नोव्हेंबर रोजी आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. किंग खानच्या वाढदिवसामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा दिवस नेहमीच खास असतो. शाहरूखच्या वाढदिवसाची भव्य पार्टीची तयारीही आधीच सुरू झाली आहे.
शाहरुख आणि गौरी खानची प्रेमकहाणी बॉलिवूडमधील सर्वात खास आणि लोकप्रिय आहे. त्यांची पहिली भेट १९८४ मध्ये दिल्लीत एका मित्राच्या पार्टीत झाली होती. त्या वेळी शाहरुख १८ वर्षांचा आणि गौरी १३ वर्षांची होती. त्यांच्या लग्नात धर्माची अडचण होती, परंतु शाहरुखने गौरीच्या कुटुंबाला पटवून दिल्यानंतर २६ ऑगस्ट १९९१ रोजी दोन्ही धर्मांच्या रितीप्रमाणे लग्न झाले.
या चित्रपटात शाहरुख खान दिसणार
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यावर दिसला नाही. २०२३ मध्ये शाहरुख खानचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात पठाण, जवान आणि डोंकी यांचा समावेश आहे. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. शाहरुख आता सिद्धार्थ आनंदच्या ‘किंग’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण, सुहाना खान, जयदीप अहलावत, अर्शद वारसी, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, राघव जुयाल आणि अभय वर्मा यांचा समावेश आहे. वृत्तानुसार, ‘किंग’चा टीझर आज, शाहरुखच्या वाढदिवशी प्रदर्शित होऊ शकतो.
अडीच वर्षांत एकही चित्रपट नाही, तरीही Aishwarya Rai करोडोंची मालकीन; वाढदिवशी जाणून घ्या तिची करिअर जर्नी!
शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखले जाते. या अभिनेत्याचे चाहते केवळ देशभरातच नाही तर परदेशातही प्रचंड आहेत. त्याचे चाहते त्याच्या “किंग” नावाच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात किंग खान त्याची मुलगी सुहाना खानसोबत आहे. तर, अभिनेता आज २ नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत असल्याने, चित्रपटासंबंधी घोषणा आज केली जाऊ शकते असा अंदाज लोकांनी वर्तवला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक काही काळापासून सोशल मीडियावरही सूचना देत आहेत.






