फोटो सौजन्य - Social Media
4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2: द रुल’च्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे. आता या प्रकरणाने संपूर्ण राजकीय वादाचे रूप धारण केले आहे. अल्लू अर्जुनच्या कथित वागणुकीमुळे संतप्त झालेल्या निजामाबाद ग्रामीणचे काँग्रेस आमदार भूपती रेड्डी यांनी अल्लू अर्जुनचे चित्रपट येथे चालू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. आणि तसेच त्यांनी अभिनेत्याला अपमानास्पद भाषा वापरली आहे. याचप्रकारणी आता मोठी बातमी समोर आली आहे.
अल्लूच्या चित्रपटासाठी भूपती रेड्डी यांचे स्पष्ट शब्द
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निजामाबाद जिल्ह्यातील मोपाल मंडल अंतर्गत न्याकल गावात एका जाहीर सभेत भूपती रेड्डी यांनी दक्षिणेतील अभिनेता अल्लू अर्जुन यांच्याविरोधात अपशब्द वापरले आणि म्हणाले, “काँग्रेस पक्ष चित्रपट उद्योगाच्या विरोधात नाही. तस्करांना प्रोत्साहन देण्यासाठी बनवलेला अल्लूचा चित्रपट वाईट आहे.’ असे त्यांनी सांगितले.
‘पुष्पा २’च्या वादग्रस्त घडामोडीनंतर दिग्दर्शकांचा धक्कादायक निर्णय, सुकुमार नेमकं काय म्हणाले ?
भूपतीने अल्लूला इशारा केला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूपती पुढे म्हणाले की अल्लू अर्जुन चेंगराचेंगरीच्या ठिकाणी असलेल्या संध्या थिएटरमध्ये गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याला स्क्रीनिंगला जाण्यास नकार दिला. भूपती रेड्डी म्हणाले, “तुम्ही तुमचे काम करा आणि जगा. तेलंगणासाठी तुमचे योगदान काय आहे?” भूपतीने धमकीवजा शब्दात सांगितले की, “मी तुम्हाला (अल्लू अर्जुन) चेतावणी देत आहे. तुम्ही असेच वागले तर आम्ही तुमचे चित्रपट तेलंगणा सरकारच्या अधिपत्याखाली चालू देणार नाही.” तुम्ही तुमचे काम करू शकत असाल तर नीट करा, नाहीतर आंध्र प्रदेशात जा, असे ते म्हणाले.
Baby John: थेरीच्या रिमेक ‘बेबी जॉन’वर दलपती विजयने सोडले मौन, ॲटलीशी केला मनापासून संवाद!
काय होते संपूर्ण प्रकरण
‘पुष्पा 2 द रुल’ दरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लूला अलीकडेच अटक करण्यात आली होती, परंतु नंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर अल्लूने एक पत्रकार परिषद बोलावली, ज्यामध्ये त्याने खूप चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे सांगितले. मात्र, याप्रकरणी अल्लूची पोलिसांनी चौकशी केली आहे.