फोटो सौजन्य - Social Media
वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ हा चित्रपट आज म्हणजेच २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट थेरी या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यात दलापथी विजय मुख्य भूमिकेत होते. हा तमिळ चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याचे दिग्दर्शन ॲटली यांनी केले होते. हा त्याचा दुसरा चित्रपट होता. बेबी जॉनचे दिग्दर्शन कलीज यांनी केले आहे. हा चित्रपट आज नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाची आज जबरदस्त कमाई होणार आहे. या चित्रपटामधील अभिनेत्याचा डॅशिंग लुक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.
बेबी जॉनच्या रिलीजच्या एक दिवस आधी, विजयने ॲटली आणि बेबी जॉनच्या सर्व कलाकारांचे चित्रपटासाठी अभिनंदन केले आणि बेबी जॉन बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल अशी आशा देखील व्यक्त केली आहे. बेबी जॉन, वरुण धवन, दक्षिण अभिनेत्री कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव यांच्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मुराद खेतानी, प्रिया ॲटली आणि ज्योती देशपांडे यांनी निर्मिती केली आहे.
Best wishes to @Atlee_dir @Varun_dvn @KeerthyOfficial @priyaatlee #WamiqaGabbi @MusicThaman @kalees_dir @AntonyLRuben and the entire #BabyJohn team for the release tomorrow.
Wishing you all a blockbuster success ♥️ pic.twitter.com/uaoxmJ1cr8
— Vijay (@actorvijay) December 24, 2024
दलपती विजयने X वर लिहिले, “वरूण धवन, वामिका गब्बी आणि कीर्ती सुरेश आणि बेबी जॉनच्या संपूर्ण टीमला उद्याच्या रिलीजसाठी शुभेच्छा. तुम्हा सर्वांना ब्लॉकबस्टर यश मिळण्यासाठी शुभेच्छा.” ॲटलीने विजयला उत्तर दिले, “तुझ्यावर प्रेम आहे, तुमचे खूप खूप आभार. याचा आमच्यासाठी खूप अर्थ आहे.” असे लिहून ॲटलीने पोस्ट शेअर केली आहे.
Love you na
Thank you soooo much
It means a lot to us ❤️❤️❤️❤️ https://t.co/DqS5ViVyEk— atlee (@Atlee_dir) December 24, 2024
Baby John Review: सलमानच्या कॅमिओमुळे चित्रपट हिट, जाणून घ्या चाहत्यांचा रिव्ह्यू!
कलीज दिग्दर्शित “बेबी जॉन” च्या निर्मात्यांनी त्याच्या ॲक्शन सीक्वेन्सचे नृत्यदिग्दर्शन करण्यासाठी आठ आंतरराष्ट्रीय ॲक्शन डायरेक्टर्सच्या टीममध्ये सहभाग घेतला आहे. आठ ॲक्शन दिग्दर्शक अनल अरासू, स्टंट सिल्वा, अनबारीव, यानिक बेन, सुनील रॉड्रिग्ज, कालोयन वोडेनिच्रोव्ह, मनोहर वर्मा, ब्रॉनविन ऑक्टोबर यांनी चित्रपटातील आठ प्रमुख ॲक्शन सीक्वेन्स कोरिओग्राफ केली आहे. जी प्रेक्षकांना पाहताना मज्जा येणार आहे.