(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या आयुष्यात चिमुरड्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. कतरिना-विकी पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्याचे समोर आले आहेत. ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये हे कपल त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करतील. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रांची अशी माहिती आहे की, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये हे दाम्पत्य त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करतील. अद्याप या जोडप्याने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
तसेच काही महिन्यांपूर्वी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात अभिनेत्री सैल शर्टमध्ये दिसली तेव्हा गरोदरपणाच्या चर्चांना सुरूवात झाली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर असेही बोलले गेले की, ती सैलसर शर्टमध्ये बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न करते आहे.
कतरिनाने जेव्हापासून सैलसर कपडे घालायला सुरुवात केली आणि सार्वजनिक ठिकाणी जाणं कमी केलं, तेव्हापासून तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरू झाल्या. पण विकी आणि कतरिनानेही अनेकदा अशा चर्चांकडे दुर्लक्ष केलं आहे.
“इडलीसाठी सकाळी 4 वाजता उठून फुलं विकायचो” धनुषने सांगितली बालपणीची आठवण
कतरिना प्रेग्नन्सीनंतर चित्रपटांपासून दूर राहणार ?
रिपोर्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, बाळाच्या जन्मानंतर कतरिना काही काळासाठी चित्रपटांपासून दूर राहणार आहे.
ती काही काळ कामाला ब्रेक देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चाहत्यांमध्ये उत्सुकता
VicKat चाहत्यांचे सोशल मीडिया फॅन पेजेस या चर्चेने भरून गेले आहे. ‘बाळ कोणासारखं दिसेल?’, ‘VicKat बाळाचं नाव काय ठेवतील?’ अशा चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगताना दिसत आहेत.
अभिनेत्री स्पृहा जोशी झाली मावशी, स्पृहाने केली गोड पोस्ट..
आधीही प्रेग्नन्सीवर रंगली होती चर्चा
‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जेव्हा विकीला याविषयी विचारण्यात आलं, तेव्हा त्याने विनोदी पद्धतीने उत्तर दिलं होतं ‘गुड न्यूज असेल तर आम्हाला ती तुमच्यासोबत शेअर करायला आनंद होईल. पण सध्या या अफवांमध्ये काही तथ्य नाही