Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान” चित्रपटाचे पोस्टर लाँच; अभिनेता चंदन रॉय सन्याल मुख्य भूमिकेत!

अभिनेता चंदन रॉय सन्यालचा लवकरच बंगाली चित्रपट "बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान” चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता श्री रामकृष्ण परमहंस देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 02, 2025 | 10:56 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

देव एंटरटेनमेंट व्हेंचर्सच्या आगामी बहुप्रतीक्षित “बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान”च्या पोस्टरचे अनावरण नुकतेच विनोदिनी या पूर्वी स्टार थिएटर म्हणून कलकत्ता येथे प्रसिद्ध असलेल्या सिनेमागृहात कारण्यात आले. हे पोस्टर चित्रपटाचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या हस्ते संपन्न झाले. पोस्टरमध्ये एक महान संत, आध्यात्मिक गुरु अशी ओळख असलेल्या प. पूज्य श्री रामकृष्ण परमहंस देव यांच्या परिवर्तनात्मक चित्रणात अभिनेता चंदन रॉय सान्याल यांची विशेष ओळख करून देण्यात आली आहे. प्रमोद फिल्म्स द्वारे विविध मोशन पिक्चर्सच्या संयुक्त विद्यमाने निर्मित आणि देव एन्टरटेन्मेंट व्हेंचर्स प्रस्तुती असलेला बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान हा बंगाली भाषेतील चित्रपट येत्या २३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट उत्तर कोलकात्यातील रेड-लाइट एरियतील एका तरुण मुलीचा प्रेरणादायी पण हृदयद्रावक प्रवासाचे वर्णन करणारा आहे. ज्या मुलीने थिएटर क्षेत्रात येऊन यशस्वी कारकीर्द घडवली जिला नटी बिनोदिनी म्हणून ओळखले जाऊ लागले.अनेक अडीअडचणींचा सामना करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नटी बिनोदिनी यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांनी पुरुषप्रधान समाजात प्रतिष्ठेसाठी लढणारी एक स्त्री म्हणून तिचा संघर्ष आणि विजय अधोरेखित करून, बिनोदिनीची कथा जिवंत केली आहे. हा चित्रपट १९व्या शतकातील बंगालच्या दोलायमान पण दमनकारी नाट्यसंस्कृतीतून तिच्या संगीत आणि नाट्यमय वारशाने समृद्ध झालेला तिचा प्रवास दर्शवणारी आहे.

Bigg Boss 18 : चाहत पांडेची आई अविनाश मिश्रावर संतापली! टेलिव्हिजनवर अभिनेत्याची घेतली क्लास

बिनोदिनी हा केवळ बायोपिकपेक्षा अधिक आहे. स्वप्नांच्या शोधात अथक आव्हानांना तोंड देणाऱ्या महिलांच्या अदम्य भावनेला ही श्रद्धांजली आहे. रामकृष्ण परमहंस देव म्हणून चंदन रॉय सन्याल यांचा समावेश कथेचा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे कथेत खोलवर भर पडते. या चित्रपटाबाबत देव एन्टरटेन्मेंट व्हेंचर्सच्या वतीने देव म्हणाले, “देव एंटरटेनमेंट व्हेंचर्सने कथा कथनाच्या कलेची सुरुवात केली, ते थिएटरमधील बिनोदिनी दासी यांचे जीवन आणि वेळ पुन्हा निर्माण करणे हे एक मोठे कार्य होते. अशा टीमसोबत काम करणं हा एक अनुभव होता. आम्ही हा चित्रपट अगदी मनापासून बनवला आहे आणि आता तो प्रदर्शित होण्याची वाट आम्ही आतुरतेने पाहत आहोत.” असे त्यांनी सांगितले.

अभिनेते चंदन रॉय सान्याल चित्रपटाच्या भूमिकेबाबत मत व्यक्त करताना म्हणाला की, ‘दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांनी जेव्हा मला या भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा मला तो विनोद करत असल्याचे वाटले. राम कमल मुखर्जी स्वतः एक पत्रकार असून आता एक उत्तम चित्रपट निर्माते झाले आहेत. मला माझ्या कारकिर्दीतली हि सर्वात लॅटीन भूमिका असल्याचे मी मान्य करतो. एका कठीण भूमिकेसाठी त्यांनी माझी निवड केली याचा मला आनंदही तितकाच आहे. रामकृष्ण ही व्यक्तिरेखा साकारणे खूप अवघड आहे. त्याने माझी खूप काळजी घेतली आणि ही भूमिका त्याने अगदी सहजपणे माझ्याकडून करून घेतली.’ असे अभिनेत्याने सांगितले.

पोस्टरचे अनावरण एका भावनिक प्रवासाची सुरुवात दर्शवते जे स्त्रियांबद्दलच्या समाजाच्या आकलनातील गुंतागुंत, बंगाली रंगभूमीची दोलायमान संस्कृती आणि नाती बिनोदिनीचा चिरस्थायी वारसा यांचा अभ्यास करते. या चित्रपटात अभिनेता राहुल बोस, कौशिक गांगुली, मीर, चंद्रेयी घोष आणि ओम सहानी यांसारखे प्रतिभावान कलाकार आहेत. प्रियांका पोद्दार यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत तर अभिरा चक्रवर्ती यांनी संशोधन केले आहे. सौमिक हलदर हे डीओपी आहेत. सौरेंद्रो सोम्योजित या दिग्गज संगीतकार जोडीने चित्रपटाला संगीत दिले आहे. तन्मय चक्रवर्ती हे कला दिग्दर्शक आहेत आणि चित्रपटाचे संपादन प्रणॉय दासगुप्ता यांनी केले आहे. सुचस्मिता दासगुप्ता यांनी वेशभूषा केली आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यपने थेट बॉलिवूड इंडस्ट्रीचीच काढली अक्कल, नवख्या कलाकारांचेही टोचले कान

बिनोदिनी हा एक असा चित्रपट आहे जो स्त्रियांच्या न सांगितल्या जाणाऱ्या कथांवर प्रकाश टाकतो आणि स्वप्न पाहण्याच्या धाडसासाठी त्यांना किती किंमत मोजावी लागते यावर भाष्य करतो. येत्या २३ जानेवारी २०२५ ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ज्याचा आनंद प्रेक्षकांना सिनेमागृहात घेता येणार आहे.

Web Title: Film binodini sri ramakrishna first look poster reveal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
3

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
4

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.