
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
हिंदी चित्रपटसृष्टीत किसिंग सीन ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. पण एक काळ असा होता जेव्हा पडद्यावर असे सीन दाखवणे कलाकारांसाठी आव्हानापेक्षा कमी नव्हते. आपण बॉलीवूडमध्ये विविध प्रकारचे कंटेंट पाहिले आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की मोठ्या पडद्यावर किसिंग सीन करणारी पहिली अभिनेत्री कोण होती? ज्या काळात रोमँटिक दृश्ये चित्रित करणे देखील कलाकारांसाठी आव्हानात्मक होते, त्या काळात या अभिनेत्रीने तिच्या किसिंग सीनने इतिहास रचला.
ही अभिनेत्री आहे तरी कोण?
१९३३ मध्ये मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा प्रेक्षकांना किसिंग सीन दिसला. या ब्लॅक अँड वाईट बॉलीवूड चित्रपटाचे नाव ‘कर्मा’ होते. या चित्रपटात देविका राणीने अभिनेता हिमांशू रायसोबत पहिला किसींग सीन केला. देविका आणि हिमांशूने चित्रपटात त्यांच्या किसींग सीनने प्रेक्षकांना तसेच अनेक चित्रपट कलाकारांना आश्चर्यचकित केले. हा किसिंग सिन ४ मिनिटांचा होता. परंतु, हिमांशू आणि देविका वास्तविक जीवनात पती-पत्नी होते, त्यामुळे हा किसिंग सीन करणे सोपे होते.
हा चित्रपट वादात सापडला होता
जरी हिमांशू आणि देविका पती-पत्नी असले तरी, त्या काळात पडद्यावर किसिंग सीन घेणे ही एक मोठी गोष्ट होती. त्यामुळे, स्वाभाविकच, वाद अपरिहार्य होते. पडद्यावर अशा दृश्यांच्या चित्रणावरून लोकांचा बराच गोंधळही उडवला. यामुळे चित्रपटाबद्दल बरीच चर्चा झाली. हिमांशू आणि देविका त्या काळातील सुपरस्टार होते आणि त्यांची पडद्यावरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.
Spirit First Look: जखमी प्रभास अन् तृप्तीच्या हातात लायटर…, ‘अॅनिमल’ पेक्षाही खतरनाक ‘स्पिरिट’!
चित्रपट इंडस्ट्रीमध्ये झाले बदल
१९३३ मधील या दृश्यामुळे उद्योगात एक बदल झाला आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये अशाच प्रकारची दृश्ये समाविष्ट करण्यात आली. आज बहुतेक चित्रपटांमध्ये किसिंग सीन सामान्य झाले आहेत आणि प्रेक्षकांना त्यांची सवय झाली आहे. देविका राणी आणि हिमांसू राय यांच्या “कर्मा” चित्रपटाने या बदलात महत्त्वाची भूमिका बजावली.