(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
लोकप्रिय टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी त्याच्या पत्नीसोबत दुबईमध्ये सुट्टी साजरी करत होता. तो ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तिथे गेला होते. आणि अशातच आता, बातमी समोर आली आहे की हे जोडपे ट्रिप सोडून मुंबईला परतले आहे. अर्जुन बिजलानीचे सासरे रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची तब्येत अचानक बिघडली असल्याचे समजले आहे. परंतु, अभिनेत्याच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही.
‘टेली चक्कर’ मधील वृत्तानुसार, अर्जुन बिजलानीला जेव्हा कळले की त्याचे सासरे, त्याची पत्नी नेहाचे वडील, आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याने दुबईचा प्रवास अर्धवट सोडला आणि पुन्हा घरी परतला आहे. अर्जुन आणि नेहा देखील दुबईमध्ये नवीन वर्ष साजरे करणार होते, परंतु या कठीण काळात कुटुंबाला त्याची गरज होती. अर्जुन त्याची पत्नी नेहा आणि मुलासह लगेचच मुंबईला परतला आहे.
‘Ikkis’मधील भारत-पाकिस्तान संवादावर CBFC ची कात्री, अनेक सीन कट केल्यानंतर मिळाले U/A प्रमाणपत्र
अर्जुनच्या पत्नीने फादर्स डे निमित्त वडिलांना दिल्या शुभेच्छा
अर्जुनची पत्नी नेहा बिजलानी हिने १५ जून २०२५ रोजी तिचे वडील राकेश स्वामी यांच्यासाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्यांना फादर्स डेच्या शुभेच्छा देताना तिने लिहिले, “माझ्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा. तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या कुटुंबावर प्रेम केले, मार्गदर्शन केले आणि त्यांचे रक्षण केले… अर्जुनने तुमच्याकडून शिकावे अशी माझी नेहमीच इच्छा होती. वडिलांचे प्रेम हे कुटुंबाचा पाया आहे आणि तुमच्या प्रेमामुळे मी आज जी आहे ती बनली आहे. प्रत्येक वडिलांनी असं बनण्याचा प्रयत्न करावा असा आदर्श ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला खूप खूप प्रेम आहे, बाबा.” असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली.
अर्जुन बिजलानी त्याच्या सासऱ्यांच्या खूप जवळ
अर्जुन बिजलानी त्याच्या सासऱ्यांच्या खूप जवळचा व्यक्त आहे, पण त्याला वडील नाहीत. त्याचे वडील तो १९ वर्षांचा असतानाच वारले. ते नेहमीच अभिनेत्याच्या खूप जवळचा राहिला आहे. परंतु, अर्जुनने सांगितले आहे की त्याचे वडील त्याला अभिनेता होण्यास तीव्र विरोध करत होते. परंतु, त्याच्या आई आणि पत्नीच्या पाठिंब्यामुळे तो अभिनयात करिअर करू शकला.






