Hasin Dilruba (फोटो सौजन्य - X अकाउंट)
2021 साली OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झालेल्या ‘हसीन दिलरुबा’ या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाच्या गुप्त कथेने लोकांची मने जिंकली होती. तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि हर्षवर्धन राणे स्टारर हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाची कथासुद्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा Netflix वर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तसेच आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी ते उत्सुक झाले आहेत.
या चित्रपटाची कथा एका महिलेवर आधिरीत आहे जिच्यावर पतीच्या हत्येचा संशय आहे. आता निर्माते त्याचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. नेटफ्लिक्सवर तापसी पन्नू ‘फिर से हसीन दिलरुबा’ म्हणून केव्हा परत येईल हे निर्मात्यांनी उघड केले आहे आणि रिलीजची तारीख उघड केली आहे. या चित्रपटाच्या २ भागाची आतुरता आता प्रेक्षकांना लागली आहे.
हसीन दिलरुबा २ येणार प्रेक्षकांच्या भेटीस
‘हसीन दिलरुब’ या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर ‘हसीन दिलरुबा’ चा दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये टीझरसह या चित्रपटाचा दुसरा भाग जाहीर केला. हा छोटा टीझर असल्याने चाहते OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. आता अखेर या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. यावेळी विकी कौशलचा धाकटा भाऊ सनी कौशल हर्षवर्धन राणेच्या जागी चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
9 August ki Hasseen shaam, Dillruba ke naam 🌹
Phir Aayi Hasseen Dillruba, is out on 9 August, only on Netflix ❤️🔥#PhirAayiHasseenDillrubaOnNetflix pic.twitter.com/pLqfLFR2R1— Netflix India (@NetflixIndia) July 15, 2024
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नेटफ्लिक्सने आपल्या X अकाउंटवर अनोख्या पद्धतीने जाहीर केली आहे. त्याने सर्वप्रथम धोकादायक सुंदर दिलरुबासोबत सर्वांचे लूक उघड केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “9 ऑगस्टची सुंदर संध्याकाळ, दिलरुबाच्या नावावर. ‘फिर से हसीन दिलरुबा’ 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल”. असे लिहून त्यांनी या चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. आता चाहत्यांची आतुरता संपली असून, लवकच हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix पाहता येणार आहे.
या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेसह, निर्मात्यांनी एक छोटा ॲनिमेटेड टीझर प्रसिद्ध केला आहे. ज्यात तापसी पन्नूच्या हातात असलेल्या पुस्तकात लिहिले आहे, “9 ऑगस्टला रक्त टपकेल, किलर मान्सून येईल”. याशिवाय विक्रांत मॅसीही कॅप घालून पुस्तक वाचताना दिसला आहे.
विक्रांत आणि तापसी व्यतिरिक्त, सनी कौशलचा लूक देखील अनावरण करण्यात आला, ज्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे की, “9 ऑगस्ट को दिल पिघल जाएगा, इश्क का जहेर निकलेंगे”. तसेच पहिल्या भागात तापसी पन्नूने राणी सक्सेनाची भूमिका साकारली होती, तर विक्रांत मॅसी ‘ऋषभ सक्सेना’ने तिच्या पतीची भूमिका साकारली होती. आता दुसऱ्या भागात नक्की काय कथा दाखवणार आहे हे उत्कंठाचे ठरणार आहे.