उद्योजक कृष्णा श्रॉफ ही भारतातील MMA च्या उधोकक्षेत्रातील एक चेहरा आहे तिने ‘खतरों के खिलाडी 14’ च्या टेलिव्हिजन प्रीमियरच्या आधी सोशल मीडिया वर एक खास पोस्ट शेअर केली आहे. 27 जुलैपासून टीव्हीवर प्रसारित होणारा हा शो कृष्णा श्रॉफचा पहिला टेलिव्हिजन कार्यक्रम ठरणार आहे. शोचे होस्ट आणि चित्रपट निर्माते रोहित शेट्टीसोबत दोन चित्रे शेअर करून कृष्णा श्रॉफने लिहिले की हा शो कसा “भयानक” होता परंतु तिच्या आयुष्यातील “सर्वात परिपूर्ण अनुभव” तिला या शो मधून मिळाला आहे असे तिने याआधी सांगितले होते.
परंतु, आता कृष्णा श्रॉफ ही बॉस लेडी म्हणून ओळखली जात आहे. “खतरों के खिलाडी 14” मधून तिच्या टेलिव्हिजन पदार्पणाने चर्चांना उधाण आलं होत आणि शोमध्ये आधीच तिने तिची जागा मिळवली आहे. पहिल्या एपिसोडमध्ये तिने तिचा पहिला स्टंट फक्त 6 मिनिटे 23 सेकंदात पूर्ण केला असून लष्करी दर्जाच्या विमानाच्या मागून ध्वज गोळा करण्याचे आव्हान तिला देण्यात आले होते आणि वाऱ्याचा प्रचंड दाब असूनही कृष्णाने हे कार्य पूर्ण केले आहे.
हे देखील वाचा- सनी लिओनीच्या ‘कोटेशन गँग’ला नवीन रिलीजची तारीख मिळाली निर्मात्यांनी नवीन पोस्टर केले शेअर!
शो प्रीमियर होण्यापूर्वी कृष्णाने सोशल मीडियावर होस्ट रोहित शेट्टीचे आभार व्यक्त केले. तिने लिहिले, “पहिला रिॲलिटी शो, पहिला टीव्ही स्टंट, चित्रपट निर्माता रोहित शेट्टीसह पहिला प्रोजेक्ट. रोहित सरांनी मला प्रोत्साहन दिल्याशिवाय मला मार्गदर्शन केल्याशिवाय आणि माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी सक्षम असल्याच्या मला कळले. ही हृदयस्पर्शी नोट लिहून तिने होस्टसोबत काही फोटो शेअर केले होते. या पोस्टवर चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. आणि आता या शो मध्ये ती तिचा दर्जा वाढवताना दिसून येत आहे. आणि स्पर्धकांसह ती होस्ट रोहित शेट्टी यांनादेखील चकित करताना दिसत आहे.
कृष्णा सुमोना चक्रवर्ती, गश्मीर महाजनी, करण वीर मेहरा, असीम रियाझ, शालिन भानोत, निमृत कौर अहलुवालिया आणि इतर स्पर्धकांशी कृष्णा स्पर्धा करताना दिसत आहे. एक उद्योजिका आणि आता एक टीव्ही स्टार म्हणून, कृष्णा श्रॉफ तिच्या मार्गात येणारे प्रत्येक आव्हान जिंकण्यासाठी सज्ज आहे.