(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)
जयपूरमध्ये झालेल्या २५ व्या आयफा अवॉर्ड्समध्ये बॉलिवूड स्टार्सची गर्दी झाली होती. यावर्षी आयफा देखील रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. शनिवारी रात्री डिजिटल पुरस्कार सोहळा पार पडला. समारंभात अनेक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आणि त्यांना पुरस्कार देण्यात आले. या समारंभात ‘अमर सिंह चमकिला’ आणि ‘पंचायत’ या वेब सिरीजना सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. कोणाला कोणता पुरस्कार मिळाला हे आपण आता जाणून घेणार आहोत.
सर्वोत्कृष्ट चित्रपट
‘अमर सिंह चमकिला’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. पंजाबी गायकावर आधारित बायोपिकमध्ये दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसला आहे.
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्तम कामगिरी (पुरुष)
नेटफ्लिक्सच्या ‘सेक्टर ३६’ चित्रपटासाठी अभिनेता विक्रांत मॅसीला सर्वोत्कृष्ट मुख्य भूमिकेतील (पुरुष) पुरस्कार मिळाला आहे. या बातमीने त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला आहे.
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्तम कामगिरी (महिला)
नेटफ्लिक्सच्या मिस्ट्री थ्रिलर ‘दो पती’ साठी कृती सॅननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) पुरस्कार मिळाला आहे. या बातमीने अभिनेत्रीचे चाहते देखील आनंदी झाले आहेत.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
‘अमर सिंह चमकिला’ साठी, त्याचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. आणि या खास प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करताना दिसले.
सलमान खानचा Sikandar रिमेक की ओरिजनल ? दिग्दर्शक ए.आर. मुरुगदासने जरा स्पष्टच सांगितलं…
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष)
विक्रांत मॅसीचा सहकलाकार दीपक डोब्रियालला ‘सेक्टर ३६’ साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा (पुरुष) पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (महिला)
‘बर्लिन’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी अभिनेत्री अनुप्रिया गोएंका यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (महिला) पुरस्कार देण्यात आला आहे.
वेब सिरीज विभागात कोणी जिंकले कोणते पुरस्कार?
सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार
वेब सिरीज विभागात, ‘पंचायत ३’ ला सर्वोत्कृष्ट सिरीजचा पुरस्कार पटकावला आहे.
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्तम कामगिरी (पुरुष)
अभिनेता जितेंद्र कुमार यांना सर्वोत्कृष्ट प्रमुख भूमिकेतील कामगिरीचा पुरस्कार मिळाला आहे.
नानीचा The Paradise होणार दोन भागात प्रदर्शित? जाणून घ्या कधी होणार रिलीज!
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्तम कामगिरी (महिला)
अभिनेत्री श्रेया चौधरीला ‘बंदिश बॅन्डिट्स’च्या दुसऱ्या सीझनसाठी सर्वोत्कृष्ट मुख्य भूमिकेतील (महिला) पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार
‘पंचायत ३’ साठी दीपक कुमार मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष)
‘पंचायत’ मध्ये प्रल्हाद चाची भूमिका साकारणाऱ्या फैसल मलिकला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष) श्रेणीत सन्मानित करण्यात आले आहे.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेतील कामगिरी (महिला)
संजय लीला भन्साळी यांच्या पहिल्या ओटीटी मालिकेतील ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ मधील भूमिकेसाठी अभिनेत्री संजीदा शेखला सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेतील (महिला) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.