Salman Khan Sikandar Is Not Remake Of Any Movie Director Ar Murugadoss Reacted
गेल्या वर्षापासून सलमान खान ‘सिकंदर’ चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आहे. एप्रिल २०२४ पासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करण्यात आली होती. चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी ‘ईद’च्या मुहूर्तावर चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून प्रेक्षक चित्रपटासाठी कमालीचे उत्सुक आहेत. पहिल्यांदाच ‘सिकंदर’ चित्रपटाच्या निमित्ताने रश्मिका मंदान्ना आणि सलमान खान एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. ए. आर. मुरुगोदास दिग्दर्शित या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सोशल मीडियावर ‘सिकंदर’ चित्रपट रिमेक असल्याची चर्चा सुरु आहे. आता सर्व या चर्चांदरम्यान दिग्दर्शक ए. आर. मुरुगोदास यांनी एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाची कथा ओरिजनल आहे की रिमेक आहे ? यावर भाष्य केलंय.
महेश मांजरेकर यांच्या नाटकातून ‘फिल्टर कॉफी’ दरवळणार, मराठी रंगभूमीवर दिसणार दमदार कलाकारांची फळी
मुलाखतीत ए.आर.मुरुगोदास म्हणाले की, “हा संपूर्ण चित्रपट एका ओरिजिनल कथेवर बनवला गेला आहे. या चित्रपटातील एकूण एक सीन्स ऑथेंटिक पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन आणि फ्रेश अनुभव मिळेल. हा सिनेमा रिमेक नाहीये. चित्रपटाच्या ओरिजनेलीटीचा एक भाग म्हणजे त्याचे शक्तिशाली पार्श्वसंगीत, जे अत्यंत प्रतिभावान संतोष नारायणन यांनी संगीतबद्ध केले आहे. सिनेमाचं संगीत, ॲक्शन, इमोशनल सीन्स या प्रत्येक गोष्टी प्रेक्षकांना आवडतील याची आम्हाला खात्री आहे.”
कोडावा समाजाने मागितली रश्मिकासाठी सुरक्षा, अमित शहांना लिहिले पत्र; काय आहे संपूर्ण प्रकरण?
ए.आर.मुरुगोदास दिग्दर्शित चित्रपटात प्रमुख भूमिकेत, सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबतच सत्यराज मिनिस्टर, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर आहे. चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करीत असून २०२५ च्या ‘ईद’च्या मुहूर्तावर चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होईल. चित्रपट रिमेक असल्याचा दावा केल्यानंतर, अनेक युजर्स म्हणू लागले की मूळ चित्रपट ओटीटीवर उपलब्ध असताना आम्ही थिएटरमध्ये का जायचे ? याशिवाय, सलमानच्या चित्रपटाबद्दल लोक ज्या पद्धतीने गोंधळ घालत आहेत. शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाबाबतही असेच घडले होते. जो मल्याळम चित्रपट ‘मुंबई पोलिस’चा रिमेक होता.
निर्मात्यांनी म्हटले होते की हा चित्रपट रिमेक नाही. पण जेव्हा ते प्रदर्शित झाले तेव्हा प्रेक्षकांनी सर्वकाही पकडले. यामुळे चित्रपटाचे नुकसान झाले आणि तो फ्लॉप झाला. एवढेच नाही तर ‘बेबी जॉन’ मध्येही असेच दिसून आले, जो विजयच्या ‘थेरी’ चा हिंदी रिमेक होता आणि तो चित्रपट युट्यूबवर हिंदीमध्ये सहज उपलब्ध आहे. आता जर दिग्दर्शक स्वतः म्हणतो की सलमान खानचा चित्रपट रिमेक नाही आणि प्रेक्षकांना थोडीशीही चोरी आढळली तर भाईजानलाही नुकसान होऊ शकते.