
(फोटो सौजन्य-Social Media)
अक्षय कुमारच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘हाऊसफुल’च्या पाचव्या भागाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. मनोरंजनाचा पुरेपूर डोस देणाऱ्या या चित्रपटाबाबत दररोज काही ना काही अपडेट समोर येत आहेत. अक्षय कुमार-रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्याशिवाय संजय दत्त, फरदीन खान, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ आणि डिनो मोरिया हे देखील चित्रपटात नायक म्हणून महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच आताच्या वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांनी कलाकारांनंतर त्यांच्या चित्रपटातील पाच नायिकांची नावेही फायनल केली आहेत.
हा बिग बॉसमधील ही स्पर्धक देखील हाऊसफुल कुटुंबाचा भाग झाली
सर्वात मोठ्या विनोदी चित्रपटांपैकी एक हाऊसफुल 5 यावेळी एका क्रूझवर चित्रित होणार आहे. त्यामुळे रहस्यमय, विचित्र आणि भ्रामक पात्र सर्व चित्रपटात एकाच फ्रेममध्ये दिसणार आहे. पुरुष पात्रांना अंतिम रूप दिल्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या अभिनेत्रीची देखील निवड केली आहे. पिंकविलाच्या बातमीनुसार, जॅकलीन फर्नांडिस हाऊसफुल ५ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तिने याआधी पहिल्या भागात विशेष भूमिका आणि दुसऱ्या भागात मुख्यभूमीका साकारली होती. या अभिनेत्री व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये नर्गिस फाखरी, सोनम बाजवा, चिद्रांगदा सिंग आणि सौंदर्या शर्मा या अभिनेत्रीही चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
सौंदर्या शर्मा दिसणार हाऊसफुल 5 चित्रपटात
बिग बॉसनंतर सौंदर्या शर्मासाठी ही सुवर्णसंधी आहे. ‘हाऊसफुल 5’मध्ये प्रत्येक अभिनेत्रीला कास्ट करण्यामागे एक मोठे कारण असल्याचा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. सौंदर्याला या चित्रपटामधून पहिल्यांदाच पदार्पण करत असून, तिला पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत.
हे देखील वाचा- ‘लग्नाची सीडी हरवल्यामुळे उडणार गोंधळ’?, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’चा ट्रेलर झाला रिलीज!
हाऊसफुल 5’चे 45 दिवस परदेशात शूटिंग होणार आहे
अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या या कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग याच महिन्याच्या १५ तारखेपासून सुरू होणार आहे. चित्रपटाचे पहिले शेड्यूल ४५ दिवस लंडनमध्ये शूट केले जाणार आहे. खिलाडी कुमारने गेल्या वर्षी ४ डिसेंबरला हाऊसफुल ५ चे पोस्टर शेअर करून याची घोषणा केली होती. पोस्टरवर चित्रपटाची रिलीज डेटही लिहिली होती. या चित्रपट ६ जून २०२५ मध्ये रिलीज होणार आहे.