अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या वर्षी या जोडप्याने लग्न केले. मार्च आणि मे मध्ये दोन भव्य प्री-वेडिंग सेलिब्रेशनही पाहायला मिळाले. परंतु आता अखेर हे जोडप १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाआधी अंबानी कुटुंबात सेलिब्रेशन सुरू झाले आहेत. 4 जुलै रोजी अँटिलियामध्ये ‘मामेरू सेरेमनी’ आयोजित करण्यात आले होते, ज्यात अंबानी कुटुंबातील नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित राहिलेले दिसून आले होते. आता एक प्रसिद्ध हॉलिवूड गायक जस्टिन बीबर हा सुद्धा या लग्नामध्ये हजेरी लावताना दिसून येणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या कार्यक्रमात जस्टिन बीबर परफॉर्म करणार असे समजले आहे.
जस्टिन बीबर भारतात पोहोचला
अंबानींच्या लग्नात हॉलिवूडच्या गायकांनी परफॉर्म करू नये, असे होणे अशक्य आहे. मार्चमध्ये रिहानाने जामनगरमध्ये तिच्या आवाजाची जादू पसरवली होती. केटी पेरीने क्रूझ पार्टीत तिचा परफॉर्मन्स दिला होता. आता गायक जस्टिन बीबर लग्नात खळबळ माजवणार आहे. जस्टिन बीबर या लग्नाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा सुरु आहे. आणि याचदरम्यान आज गुरुवार, 4 जुलै रोजी गायक मुंबईत पोहोचल्याची बातमी समोर येत आहे. या लग्नात जस्टिन बीबर परफॉर्म करणार अजून तो या सोहळ्याचा दर्जा वाढवणार आहे. जस्टिन बीबरचे अनेक भारतीय चाहते सुद्धा आहेत त्याला या कार्यक्रमात पाहून त्यांना आनंद होणार आहे.
जस्टिन बीबर उद्या परफॉर्म करणार आहे
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 5 जुलै रोजी पॉप आयकॉनच्या परफॉर्मन्सची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि लोक या भव्य संगीत रात्रीचा आनंद घेण्यासाठी वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संगीतकार जस्टिन बीबरला 10 मिलियन डॉलर्स फी दिली गेली आहे.
हे गायकही परफॉर्म करू शकतात
एका पापाराझीने शेअर केलेल्या क्लिपमध्ये जस्टिनची कार मुंबईत दिसत आहे. यापूर्वी इंडिया टुडेने वृत्त दिले होते की ॲडेल, ड्रेक आणि लाना डेल रे हे मुंबईतील अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यात गाणी सादर करण्यासाठी अंबानी कुटुंबाशी चर्चा करत आहेत.