(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर ‘वॉर २’ या अॅक्शन ड्रामा चित्रपटात दिसणार आहेत, जो तीन दिवसांनी १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या स्पाय अॅक्शन चित्रपटात कियारा अडवाणी देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटात आणखी एक अभिनेता दिसणार असल्याचे समोर आले आहे, जो चित्रपटात कॅमिओ करणार आहे.आता हा अभिनेता कोण आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
बॉबी देओल दिसणार कॅमिओ भूमिकेत
अलिकडच्या तेलुगू रिलीजपूर्व कार्यक्रमामुळे ‘वॉर २’च्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. रिलीजपूर्वी सोशल मीडियावर एका नवीन पात्राची चर्चा सुरू आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटात बॉबी देओलची छोटी भूमिका असू शकते असे वृत्त आहे. १२३ तेलुगू डॉट कॉमच्या वृत्तानुसार, बॉबी चित्रपटाच्या शेवटी दिसणार आहे, ज्यामुळे असे सूचित होते की तो भविष्यात YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपटांमध्ये एक मोठा खलनायक बनू शकतो.
‘वॉर २’ चित्रपटाबद्दल
YRF चा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वॉर २’ हा अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स अंतर्गत आदित्य चोप्रा निर्मित एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. YRF स्पाय युनिव्हर्समधील हा सहावा चित्रपट आहे. या चित्रपटात हृतिक रोशन मेजर कबीर धालीवालची भूमिका पुन्हा साकारत आहे, तर कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ‘वॉर’ (२०१९) चा सिक्वेल आहे. चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
चित्रपटाचा प्री-रिलीज प्रोमो
एवढंच नाही तर अलिकडेच निर्मात्यांनी चित्रपटाचा प्री-रिलीज प्रोमो देखील शेअर केला आहे. हा प्रोमो व्हिडिओ yrf च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. प्रोमो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, १४ ऑगस्टपासून चित्रपटगृहांमध्ये कार्नेज पाहण्यासाठी तुम्ही तयार आहात का? दोघेही या चित्रपटामध्ये ॲक्शन भूमिकेत दिसणार आहेत. चाहते या दोघांचीही केमिस्ट्री पाहण्यासाठी आतुर आहेत.