(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
११ ऑगस्ट १९८५ रोजी बहरीनमध्ये जन्मलेली बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अलिकडेच जॅकलिन ‘हाऊसफुल ५’ चित्रपटामध्ये दिसली होती. आज जॅकलिनच्या वाढदिवशी, तिच्या कामाबद्दल, एकूण संपत्तीबद्दल, येणाऱ्या चित्रपटांबद्दल आणि तिच्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
वाढदिवस आणि सुकेशची भेट
जॅकलिन फर्नांडिस ११ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी याच प्रसंगी तुरुंगात बंद असलेल्या तिच्या कथित बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरने तिला एक यॉट भेट दिली होती, यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावर आणखी चर्चेत आली. सुकेशने यापूर्वी जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत, त्यापैकी काही २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. सोशल मीडियावर त्यांचे काही रोमँटिक फोटो व्हायरल झाल्यानंतर जॅकलिनचे नाव सुकेश चंद्रशेखरशी जोडले गेले होते.
अनुपम खेर यांची तक्रार! “ती रोहिणी हट्टंगडी, मालिकेत…” ‘तो’ किस्सा आला चर्चेत
अभिनेत्रीची चित्रपट कारकीर्द
श्रीलंकेत जन्मलेल्या जॅकलिनने २००९ मध्ये “अलादीन” या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या प्रमुख चित्रपटांमध्ये “किक”, “रेस २”, “हाऊसफुल” आणि “जुडवा २” यांसारख्या चित्रपटाचा समावेश आहे. अभिनेत्रीच्या अभिनय आणि नृत्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अलीकडेच ती “हाऊसफुल ५” चित्रपटामध्ये दिसली, या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला. आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली.
फिटनेसवर अभिनेत्री करते लक्ष केंद्रित
जॅकलिन तिच्या फिटनेस आणि अध्यात्मासाठी देखील ओळखली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती तिच्या दिवसाची सुरुवात योगा आणि बुलेटप्रूफ कॉफीने करते, ज्यामुळे ती उत्साही राहते. ती सोशल मीडियावर चाहत्यांसह फिटनेस टिप्स देखील शेअर करताना दिसत असते. तसेच अभिनेत्रीचा लूक आणि सौंदर्याचे देखील चाहते फिदा आहेत.
अभिनेत्रीची एकूण संपत्ती
जॅकलिनची एकूण संपत्ती सुमारे १००-१३० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, ती ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियामधून देखील कमाई करते. तिची लक्झरी जीवनशैली आणि फॅशन सेन्स तिच्या लोकप्रियतेचा एक भाग आहे. अभिनेत्रीचा चाहता वर्ग देखील जास्त आहे.
वैयक्तिक जीवन आणि अलीकडील बातम्या
जॅकलिनने अलीकडेच तिच्या आई किम फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले, त्यांचे निधन एप्रिल २०२५ मध्ये झाले होते. तिने सांगितले की तिच्या आईच्या निधनाने ती खूप दुःखी होती, परंतु तिच्या कुटुंबाचा आधार तिची शक्ती बनली. सुकेशने तिच्या आईच्या निधनाबद्दल एक पत्र लिहिले आणि बालीमधील एक बाग तिला समर्पित केली. यावर जॅकलिनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
जॅकलिनच्या कामाची व्याप्ती
अलीकडेच जॅकलिन ६ जून २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ५’ या कॉमेडी चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख असे अनेक मोठे स्टार कमर करताना दिसले. ती ‘वेलकम टू द जंगल’ या कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय, जॅकलिन जीन-क्लॉड व्हॅन डॅमेसोबत हॉलिवूड चित्रपट “किल एम ऑल २” मध्ये काम करत असल्याचे वृत्त आहे, जो तिच्या कारकिर्दीतील एक मोठा चित्रपट ठरणार आहे.