
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान सध्या तिच्या यूट्यूब व्हीलॉग्सद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तिच्या व्हीलॉग्समधील एक प्रमुख आकर्षण म्हणजे तिचा स्वयंपाकी दिलीप, जो त्याच्या साधेपणामुळे आणि फराहशी असलेल्या त्याच्या विनोदामुळे स्टार बनला आहे. अलीकडेच दिलीपने एक खुलासा केला ज्यामुळे फराहलाही आश्चर्य वाटले.
सर्वांना माहिती आहे की दिलीप अनेकदा फराह खानच्या व्लॉगमध्ये प्रसिद्धीचे आकर्षण दाखवतो, परंतु त्याच्या अलिकडच्या व्लॉगमध्ये असे काही घडले ज्यामुळे फराह खानलाही आश्चर्य वाटले. दिलीपने विनोदाने कबूल केले की तो प्रवासासाठी फराह खानची महागडी बीएमडब्ल्यू वापरतो. यावर फराहची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
फराह नुकतीच प्रणित मोरेच्या घरी गेली होती.तेव्हा या मजेशीर प्रसंगामध्ये फराहने दिलीपला थेट विचारले की, तू आणि ड्रायव्हर उबेद माझी कार घेऊन लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता का? यावर दिलीपची बोलती बंद झाली आणि तो फक्त हसू लागला. फराह गमंतीने म्हणाली की, ”मी माझ्या घरात एक राक्षस तयार केला आहे, जो आता माझ्याच आलिशान कारमधून फिरतोय. ”प्रणितने असेही म्हटले की दिलीप त्याच्या गावातील सर्वांना सांगत असेल की ही बीएमडब्ल्यू त्याची आहे.
हा विनोद एवढ्यावरच थांबला नाही. प्रणीतच्या वडिलांनी खुलासा केला की त्यांनी एकदा दिलीपला ड्रायव्हरसोबत गाडी चालवताना पाहिले होते. फराह स्तब्ध झाली. आश्चर्यचकित होऊन तिने विचारले, “ड्रायव्हरही त्याच्यासोबत होता का? लोणावळ्यात माझ्या गाडीत उबेद आणि दिलीप कुठे एकत्र होते?” दिलीपकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते आणि तो फक्त त्याच्या प्रसिद्ध स्मितहास्याने हसला.
मागील व्हीलॉगमध्ये, दिलीपने खुलासा केला होता की त्याने दिल्लीत फक्त ३०० रुपये पगाराने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, त्यानंतर तो २०,००० रुपयांच्या नोकरीसाठी फराहच्या घरी आला होता. आज त्याचे उत्पन्न झपाट्याने वाढले आहे आणि फराह त्याला तिच्या YouTube कमाईचा वाटा देखील देते.