(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
तनु वेड्स मनू आणि तनु वेड्स मनू रिटर्न्स नंतर या चित्रपटाच्या तिसऱ्या फ्रँचायझीबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. मेकर्स त्याचा तिसरा भाग लवकरच आणण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘तनु वेड्स मनू 3’मध्ये रणौत तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. याआधी तिने तनु वेड्स मनू 2 मध्ये दुहेरी भूमिका साकारली होती. मात्र ती आता तनु वेड्स मनु 3 मध्ये तिहेरी भूमिका साकारून नव्या पात्रात दिसणार आहे.
नवीन पात्र किती वेगळे असतील ?
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, कंगना रणौतला या चित्रपटात आर माधवनसोबत तिहेरी भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. या भूमिकेसाठी कंगनाही खूप उत्सुक आहे. ती आनंद एल राय यांच्या संपूर्ण कथेची वाट पाहत आहे. हा चित्रपट अभिनेत्रीला कलाकार म्हणून एक नवीन प्रयोग करण्याची संधी मिळून देणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
हे देखील वाचा- साऊथ स्टार राजेंद्र प्रसाद यांच्या मुलीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ज्युनियर एनटीआरने व्यक्त केला शोक
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
आनंद एल राय सध्या धनुष आणि क्रिती सेननसोबत ‘तेरे इश्क में’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतरच, तनु वेड्स मनू 3 चे शूटिंग सुरू होणार आहे. जे जुलै किंवा ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या फ्रँचायझीचा पहिला चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची वाट पाहत आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.