फोटो सौजन्य - Colors सोशल मीडिया
बिग बॉस 18 : सोशल मीडियावर चर्चेत असलेला आणि ट्रोल होत असलेला प्रसिद्ध रिऍलिटी शो बिग बॉस 18 सध्या प्रेक्षकांच्या ना पसंतीचा झाला आहे. शो मध्ये मोठ्या प्रमाणात पक्षपात होत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे आणि त्यांनी एक्स (X) वर या संदर्भात ट्रेंड देखील केले होते. यावेळी प्रेक्षकांनी एक्सवर लिहिले होते की “SHAME ON COLORS TV”. बऱ्याच स्पर्धकांना मोठ्या प्रमाणात दाखवले जात आहे तर काही स्पर्धकांना जास्त स्क्रीन टाईम म्हणजेच शोमध्ये जास्त दाखवले जात आहे तर काही स्पर्धकांना अजिबात दाखवले जात नाही आहे. एवढेच नव्हे तर काही स्पर्धकांना मुद्दामून दाबले जात आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. आता सोशल मीडियावर एक नवा प्रोमो प्रेक्षकांसमोर आला आहे. शुक्रवारच्या वॉरमध्ये आणि शनिवारचे वॉरमध्ये सलमान खान नसल्यामुळे शुक्रवारच्या वॉरमध्ये एकता कपूर आणि शनिवारच्या वॉरमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी एपिसोडमध्ये होस्टिंग करताना पाहायला मिळणार आहेत.
हेदेखील वाचा – Bigg Boss 18 : एलिस कौशिकने दिली करणवीर मेहराला जीवे मारण्याची धमकी! प्रेक्षक संतापले
मागील आठवड्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता करणविर मेहराचा खेळ थोडासा डगमगलेला पाहायला मिळाला. त्यामुळे आता त्याच्याच खेळावर रोहित शेट्टीने प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये रोहित शेट्टी करणवीर मेहराला म्हणतो की, करण मला आता असं पाहायला मिळत आहे की घरामध्ये मुद्दा असतो पण तू त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत नाहीस. जसं तू श्रुतिकाला सांगितले की, मध्ये जाऊ नकोस त्या भांडणाची मजा घे!
यावर बिग बॉस 18 ची स्पर्धक आणि करणवीर मेहराची मैत्रीण श्रुतिका अर्जुन म्हणते की, तो फक्त तिथे बसून बघत होता आणि मला म्हणत होता की त्यांना जे करायचे ते करू देत ना. यावर करणवीर मेरा संतापतो आणि म्हणतो की, खूप झालं तुझं बोलणं मला आता माझं बोलणं संपवू दे. लोकांचे त्यांचे वैयक्तिक वाद आहेत त्यामुळे मी त्यांच्या वादांमध्ये मी का जाऊ? यावर रोहित शेट्टी म्हणतात की, तुझ्या खेळाच्या प्लॅनिंगमुळे आणि खेळीमुळे तू खेळामध्ये नाहीसा होत चालला आहेस.
Shanivaar Ka Vaar mein Rohit ne li Karanveer ki class, kya woh sahi se defend kar paayenge khud ko iss baar? 🤔
Dekhiye #BiggBoss18 Weekend Ka Vaar, Friday raat 10 baje aur Saturday raat 9:30 baje, sirf #colorstv aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie… pic.twitter.com/Tt7QnnELVe
— Bigg Boss (@BiggBoss) November 8, 2024
करणवीर मेहरा आणि श्रुतिका अर्जुन यांच्या मैत्रीमध्ये बऱ्याचदा असे क्षण आले आहेत. ज्यामुळे त्यांच्या मैत्रीला तडा जाण्याची शक्यता होती परंतु त्यावेळी त्यांनी सांभाळले होते पण आता रोहित शेट्टीचा समोर हे दोघे भांडतांना दिसले आहे त्यामुळे त्यांच्या मैत्री तुटणार की पुन्हा ते सांभाळणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.