फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १८ : टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस १८ ची चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड होत आहे. या शोच्या फिनालेसाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्या घरामध्ये ९ स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. फिनालेमध्ये टॉप ५ च्या शर्यतीमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धक त्यांचा खेळ मजबूत दाखवत आहेत. आगामी भागामध्ये नॉमिनेशन होणार आहेत यामध्ये रजत दलाल, श्रुतिका अर्जुन आणि चाहत पांडे हे तीन सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
Bigg Boss 18 : करणवीरची पडझड सुरू, चाहतसोबत भांडण झाल्यावर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
कालच्या भागामध्ये घरातल्या सदस्यांनी विवियन डीसेना आणि अविनाश मिश्रा यांच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित केले होते. आता करणवीर मेहरा आणि शिल्पा शिरोडकर या दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा आल्याचे पाहायला मिळणार आहे. काल लाईव्ह फिडमध्ये करणवीर मेहराने शिल्पा शिरोडकरला तिने मैत्रीमध्ये केलेल्या दिवासच्या वाटनीचे ५०-५० दिवसांसाठी विवियनकडे माफी का मागितली यावेळी ती करणला स्पष्ट उत्तर देऊ शकली नाही.
आता सोशल मीडियावर एक नवा प्रोमो आला आहे यामध्ये करणवीर मेहरा शिल्पाला मैत्रीवर प्रश्न करताना दिसणार आहे. यावेळी प्रोमोमध्ये करण शिल्पाला म्हणतो की, तुला माझा मित्र म्हणून सांगायला लाज वाटत आहे का? संपूर्ण दुनिया येऊन मला सांगून गेली की, शिल्पा तुझ्यासोबत हे करत आहे ते करत आहे पण मी त्यांना काय सांगितलं की मी माझ्या मैत्रीचं योगदान देत आहे. मी ५० दिवस करणला देत आहे त्यासाठी तू तीन दिवसांपासून विवियनची माफी मागत आहेस. मी आता स्वतःसाठी स्पष्ट झाली आहे की मी माझा फायदा कोणाला घेऊ देणार नाही आणि मी ही दोन दगडावरची मैत्री ठेवणार नाही. यावर शिल्पा शिरोडकर रडत असते.
#BiggBoss18 Tomorrow
Nomination Task!
Karanveer Mehra Aur Shilpa Ke Rishte Mein Aayi DARAAR pic.twitter.com/iefvxvIdAp— BiggBoss24x7 (@BB24x7_) January 6, 2025
करणवीर आणि शिल्पा याच्या मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये शिल्पा, करणवीर, चुम आणि श्रुतिका यांच्या ग्रुपमध्ये प्रचंड वाद पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर करणवीर आणि विवियन हे दोघे बिग बॉसच्या घरामध्ये चर्चेचा विषय सुरुवातीपासून आहेत. त्यानंतर करणवीर आणि विवियन या दोघांसोबत शिल्पा शिरोडकरची मैत्री झाली आणि त्यानंतर घरातला महत्वाचा मुद्दा म्हणजेच या तिघांची तिगडी म्हणून ओळखली जात होती. असे बऱ्याचवेळा प्रेक्षकांना दिसून आले आहे करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यामध्ये जेव्हा निवडायचे होते तेव्हा शिल्पाने विवियनला निवडले आहे.
त्याचबरोबर करणवीरला तिने नॉमिनेट देखील केले आहे. यावरून बिग बॉस, शोचा होस्ट सलमान खान असो किंवा घरातले सदस्य, त्याचबरोबर बाहेरील आलेले पाहुणे असो नेहमीच त्याच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता शोचे शेवटचे दोन आठवडे शिल्लक आहेत यामध्ये हे त्यांचे नटे तुटणार की टिकून राहणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.