फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 : टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस 18 ची चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड सुरू आहे. सध्या या शोचा सहावा आठवडा सुरू आहे आणि यामध्ये अनेक वेगवेगळी नात्याची समीकरण पाहायला मिळत आहेत. एका साईडला विवियान डिसेनाचा ग्रुप आहे. त्या दुसऱ्या साईडला करणवीर मेहराचा गट आहे. विवियन डिसेनाच्या ग्रुपमध्ये इशा सिंग, अविनाश मिश्रा, एलिस कौशिक आणि स्वतः विवियन डीसेना असा यांचा गट आहे. तर उर्वरित घरातील सर्व स्पर्धक हे कारणवीर मेहराच्या गटामध्ये आहेत.
पाहायला गेलं तर पक्की मैत्री ही विवियन डिसेनाच्या गटामध्ये दिसते. तर दुसरीकडे करणवीर मेहराचा ग्रुप हा फक्त बोलण्यासाठीच असून त्यांची मते ही फार वेगवेगळी असतात. पण हे एक मात्र पूर्णपणे स्पष्ट होते की कारणवीर मेहराचे खास मित्र-मैत्रिणी हे शिल्पा शिरोडकर, श्रुतिका अर्जुन आणि चुम दारंग हे होते. चौथा आठवड्यामध्ये टाईम गॉड या पदासाठी टास्क घेण्यात आला होता. यामध्ये दोन युवराज म्हणजेच विवीयन डिसेना आणि करणवीर मेहरा यांना युवराज बनवण्यात आले होते आणि राजमाता हे पद शिल्पा शिरोडकर यांच्याकडे होते.
हेदेखील वाचा – ‘माझ्या मुलाची 10 वर्षे वाया घालवली; यामध्ये…’; संजू सॅमसनच्या वडिलांचा धोनी, विराट आणि रोहितवर गंभीर आरोप
यामध्ये असे सांगण्यात आले होते की, करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यामध्ये जो चांगले मुद्दे मांडेल त्याच्याकडे टाईम गॉडचे पद सोपवले जाणार होते. यावेळी शिल्पा शिरोडकर यांनी विवियन डिसेनाला याला टाईम गॉडचे पद दिले होते. त्यानंतर बऱ्याचदा करणवीर मेहरा, श्रुतिका, चुम आणि शिल्पा यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाले परंतु त्यांची बऱ्याचवेळा पर्यंत त्यांनी टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. मंगळवारच्या भागामध्ये चुंम, करणवीर आणि श्रुतिका यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले. त्यानंतर चुम आणि श्रुतिका यांच्यामध्ये पुन्हा मैत्री झाली.
कालच्या भागामध्ये टाईम गॉडसाठी बिग बॉसने स्पर्धकांना टास्क दिला होता. यामध्ये शिल्पा शिरोडकर, चाहत आणि रजत दलाल हे टाईम गॉड होण्यासाठी लढत होते. यामध्ये करणवीर मेहरा हा कोणत्याच स्पर्धाकांसाठी खेळला नाही यावरून शिल्पा त्याच्यावर नाराज होताना दिसली. यावेळी करणवीरने बऱ्याचदा शिल्पाची माफी मागितली. यावेळी तो म्हणाला की, मला कळत नाही आहे की मी का खेळलो नाही. मला माझी स्वतःची लाज वाटत आहे मी मैत्रीच्या लायकीचा नाही आहे आणि त्यानंतर त्याचे अश्रू अनावर झाले आणि तो शिल्पा समोर ढसढसा रडला.
Karan Veer Mehra crying for Shilpa?pic.twitter.com/dt0mWkm7OK
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 13, 2024
श्रुतिका आणि चुम यांच्यामध्ये मैत्री झाल्यानंतर चुमने श्रुतिकाला सांगितले की, मला करण सांगत होता की मला जेव्हा तिने दुसऱ्या मुलाच्या डेटिंग बद्दल बोलणं चालू होतं ते करणला आवडलं नाही. यावेळी श्रुतिका तिला उत्तर देते आणि म्हणते की, मला वाटत आहे की तो तुला पसंत फक्त या शो साठी करत आहे. यावर चुम म्हणते की असे नाही आहे त्याचे आणि माझे विचार खूप जुळतात. कालच्या भागामध्ये बराच वेळ श्रुतिकाने करणच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला. यावरून आता तिच्या मैत्रीवर प्रेक्षक प्रश्न उपस्थित करत आहेत. तर या सगळ्यात करण एकटा पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता विकेंड वॉरमध्ये करणवर सलमान भडकणार की त्याला मार्गदर्शन करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.