हैद्राबादच्या मैदानावर संजू सॅमसनची बॅट तळपली, टीम इंडियात स्थान होणार पक्के
Sanju Samson’s father Vishwanath : संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार धोनी आणि विराट कोहली यांच्याविरोधात गंभीर वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, या तिघांनी मिळून त्यांचा मुलगा संजू सॅमसनची 10 वर्षे खराब केली. जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण.
काय म्हणालेत संजू सॅमसनचे वडील पाहा
U sure he didn't mentioned anyones name? 🤣 pic.twitter.com/k9VRIO3emd
— Arjun (@Arjun16149912) November 12, 2024
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावले
संजू सॅमसन सध्या दक्षिण आफ्रिकेत असून पहिल्या T20 मध्ये त्याने अप्रतिम शतक झळकावले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. याआधी संजूने बांगलादेशविरुद्धही शतक झळकावले होते. संजू सॅमसनने सलग दोन टी-20 सामन्यात शतके झळकावून आपली प्रतिभा सिद्ध केली. मात्र, आता हा खेळाडू त्याच्या वडिलांच्या एका वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ यांनी धोनी, विराट आणि रोहित शर्माने आपल्या मुलाची 10 वर्षे खराब केल्याचे विधान केले आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा मोठा आरोप केला आहे.
संजू सॅमसनच्या वडिलांचा गंभीर आरोप
संजू सॅमसनच्या वडिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, ‘माझ्या मुलाच्या करिअरची 10 वर्षे उद्ध्वस्त करणारे 3-4 लोक आहेत. धोनी, विराट, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी माझ्या मुलाची 10 वर्षे उध्वस्त केली. त्यांनी त्याला दुखावले आहे पण तो या संकटातून सावरला आहे. संजू सॅमसन अनेकदा टीम इंडियातून बाहेर राहतो. 2014 मध्ये टीम इंडियासाठी डेब्यू करणाऱ्या संजू सॅमसनला आतापर्यंत फारसे क्रिकेट खेळता आलेले नाही. मात्र, आता त्याने आपल्या प्रतिभेची ताकद दाखवून दिली आहे.
सॅमसनच्या वडिलांनीही या माजी क्रिकेटपटूवर ओढले आसूड
संजू सॅमसनच्या वडिलांनीही माजी क्रिकेटपटू के श्रीकांतवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, ‘के. श्रीकांतच्या कमेंटने मला खूप दुखावलं. तो म्हणाला की, संजू सॅमसनने बांगलादेशसारख्या संघाविरुद्ध शतक केले. पण शतक हे शतक असते. संजू हा शास्त्रीय खेळाडू आहे. त्याची फलंदाजी सचिन आणि राहुल द्रविडसारखीच उत्कृष्ट आहे.’ संजू सॅमसन त्याच्या वडिलांमुळे याआधीही वादात सापडला आहे. या खेळाडूच्या वडिलांनी 2016 मध्ये केरळ क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशीही भांडण केले होते. संजू सॅमसनच्या वडिलांना या खेळाडूसोबत मैदानात न येण्याचा इशारा देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा संजू सॅमसनचे वडील त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत, याचा परिणाम त्यांच्या मुलावरही होऊ शकतो.
हेही वाचा : IPL 2025 च्या अगोदर अर्जुन तेंडुलकरची शानदार कामगिरी; जाणून घ्या मेगा लिलावात मिळणार का संधी