फोटो सौजन्य - instagram
जुलै महिना अभिनेत्री कियारा अडवाणीसाठी खूप खास होता याची मागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे कियाराचा स्वतःचा वाढदिवस ३१ जुलै रोजी आहे. दुसरे म्हणजे, तिने तिच्या आयुष्यात एक गोंडस मुलीचे स्वागत केले आणि आई झाली. कियारा अडवाणीने १५ जुलै रोजी मुलीला जन्म दिला. या वर्षी तिने तिचा खास दिवस तिच्या बाळ मुलीसोबत साजरा केला, ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली. तिने या शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
फुल्ल मसाला अन् हास्याचा ड्रामा; अजय देवगणच्या ‘Son Of Sardaar 2’ उतरला प्रेक्षकांच्या पसंतीस?
शेअर केला खास फोटो
कियारा अडवाणीने काल गुरुवार ३१ जुलै रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी हा वाढदिवस तिच्यासाठी खूप खास होता, कारण हा तिचा तिच्या मुलीसोबतचा पहिला वाढदिवस होता. कियाराने आज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या केकच्या फोटोची रचना खूपच गोंडस आहे. यावर एक आई तिच्या मुलाला मिठी मारताना दिसत आहे.
कियाराने एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली
कियाराने पोस्टसोबत एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे. तिने लिहिले आहे की, ‘माझा सर्वात खास वाढदिवस. माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी वेढलेला. माझे बाळ, माझे पती आणि माझे पालक. या सेलिब्रेशनमध्ये, आम्ही या सुंदर वर्षात पाऊल ठेवत असताना दोनच गाणी वारंवार वाजत आहेत. आम्ही खूप आभारी आहोत. मी खूप भाग्यवान आहे असे मला वाटते. तुमच्या सर्व शुभेच्छांसाठी माझ्याकडून मनापासून धन्यवाद’. असे म्हणून अभिनेत्रीने ही खास पोस्ट शेअर केली आहे.
ठरलं! प्राजक्ता गायकवाडने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात
अभिनेत्रीचे आगामी चित्रपट
कियारा अडवाणीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘वॉर २’ चित्रपटात दिसणार आहे, जो या महिन्यात प्रदर्शित होत आहे. हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर अभिनीत हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटामधील गाणी देखील चाहत्यांच्या पसंतीस आली आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.