(फोटो सौजन्य - अकाउंट)
किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट गेल्या वर्षी मार्च २०२५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये कमाल केली नसली तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांकडून त्याला खूप दाद मिळाली आहे. यादरम्यान आता ‘लापता लेडीज’ची कथा साहित्यिक चोरीच्या आरोपांमुळे वादात अडकली आहे. असा दावा केला जात आहे की चित्रपटाची कथा २०१९ च्या अरबी लघुपट ‘बुर्का सिटी’ मधून चोरण्यात आली आहे. आता ‘लापता लेडीज’चे लेखक बिप्लब गोस्वामी यांनी या आरोपांवर आपले मौन सोडले आहे.
जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर, आई किम फर्नांडिस यांनी घेतला अखेरचा श्वास!
लेखक बिप्लब गोस्वामी यांनी स्पष्टीकरण दिले
‘लापता लेडीज’ चित्रपटाचे लेखक बिप्लब गोस्वामी यांनी शनिवारी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक लांब पोस्ट शेअर केली. चित्रपटावरील साहित्यिक चोरीच्या आरोपांना फेटाळून लावताना त्यांनी लिहिले की, ‘आमची कथा, पात्रे आणि संवाद १०० टक्के मूळ आहे. चित्रपटाविरुद्ध साहित्यिक चोरीचे कोणतेही आरोप खरे नाहीत. हे आरोप केवळ लेखक म्हणून माझ्या प्रयत्नांनाच कमी लेखत नाहीत तर संपूर्ण चित्रपट निर्मिती टीमच्या प्रयत्नांनाही कमी लेखत आहेत.’ असं त्यांनी म्हटले आहे.
चित्रपटाचा संपूर्ण सारांश नोंदणीकृत झाला
बिप्लब गोस्वामी पुढे लिहितात, ‘मी संपूर्ण कथेची रूपरेषा ‘टू ब्राइड्स’ या शीर्षकाने आखली होती आणि गेल्या वर्षी ३ जुलै २०२४ रोजी स्क्रीन रायटर्स असोसिएशनकडे चित्रपटाचा संपूर्ण सारांश नोंदवला होता.’ असं ते म्हणाले आहे. या नोंदणीकृत सारांशात एक दृश्य आहे ज्यामध्ये वर चुकीच्या वधूला घरी आणत असल्याचे आणि बुरख्यामुळे आपली चूक लक्षात आल्यावर कुटुंबातील इतर सदस्यांसह धक्का बसल्याचे स्पष्टपणे वर्णन केले आहे. येथूनच चित्रपटाची कथा सुरू होते.
‘स्त्री’ दिग्दर्शक अमर कौशिकने केले घृणास्पद कृत्य; का संतापले श्रद्धा कपूरचे चाहते?
त्यांनी पुढे लिहिले की, ‘चित्रपटातील दृश्यावर मी स्पष्टपणे लिहिले होते की जिथे अस्वस्थ होऊन होणार नवरा पोलिस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिसांना त्याच्या हरवलेल्या पत्नीला शोधण्यासाठी आवश्यक असलेला एकमेव फोटो देतो. त्या फोटोमध्ये वधूच्या चेहऱ्यावर ओढणी असते. यामुळे एक विनोदी क्षण निर्माण होता. बिप्लब गोस्वामी यांनी सांगितले की, २०१८ मध्ये सिनेस्तान स्टोरीटेलर्स स्पर्धेत या कथेने उपविजेता पुरस्कारही जिंकला होता.’
‘लापता लेडीज’वर काय आरोप होता?
किरण राव यांच्या दिग्दर्शित ”लापता लेडीज” या चित्रपटावर २०१९ च्या अरबी लघुपट ‘बुर्का सिटी’ची कहाणी कॉपी केल्याचा आरोप आहे. या १९ मिनिटांच्या लघुपटात एका अरब पुरूषाच्या नवीन पत्नीची जागा दुसरी स्त्री कशी घेते हे दाखवले आहे. दोन्ही महिलांनी बुरखा घातला आहे. हा एक व्यंग्यात्मक विनोदी चित्रपट होता ज्याची कथा ”लापता लेडीज” सारखीच असल्याचा आरोप आहे.